भाजपा कारंजा तालुका अध्यक्षपदी मुकुंदा बारंगे तर शहर अध्यक्षपदी दिलीप जसुतकर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१९ जानेवारी २०२०

भाजपा कारंजा तालुका अध्यक्षपदी मुकुंदा बारंगे तर शहर अध्यक्षपदी दिलीप जसुतकर

कारंजा (घा):- 

              भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणूकीच्या वतीने कारंजा तालुका व शहर तर्फे चरडे मंगल कार्यालय येथे सभा पार पडली. या निवडणुकीमध्ये पर्यवेक्षक म्हणून माजी खासदार विजय मुडे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार दादाराव केचे, कारंजा पं.स.चे सभापती जगदिश डोळे हे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी नवनिर्वाचित आमदार दादाराव केचे व प.स.सभापती जगदिश डोळे यांचा शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
            या निवडणुक प्रक्रियेमध्ये कारंजा तालुका भाजपा अध्यक्षपदी मुकुंदा बारंगे तर शहर अध्यक्षपदी दिलीप जसुतकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.


यावेळी प्रामुख्याने शिरीष भांगे,हरिभाऊ जसुतकर,जि.प.सदस्य सुरेश खवशी,रेवता धोटे,नीता गजाम,माजी सभापती मंगेश खवशी,पं.स.सदस्य रंजना टिपले,रोशनी ढोबाळे, आम्रपाली बागडे,नगरसेवक संजय कदम,बाळू भांगे,काकडे,निसार,त्याचप्रमाणे किशोर भांगे,राजू डोंगरे,सुनील वंजारी,तेजराव बंनगरे,गौरी अग्रवाल,बाबा मानमोडे,विशाल भांगे,चक्रधर डोंगरे,वसंता भांगे,शिवम कुरडा,निखिल धंडारे राणा बावरी यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.