लढा ओबीसी जनगणना 2021 आंदोलनात भूमिपुत्र सेना व मराठा सेवा संघाचा पुढाकार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२१ जानेवारी २०२०

लढा ओबीसी जनगणना 2021 आंदोलनात भूमिपुत्र सेना व मराठा सेवा संघाचा पुढाकार

नागपूर/प्रतिनिधी:
दिनांक 20 जानेवारी 2020 ला चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर NRC ,CAA च्या निषेधार्थ तसेच ओबीसी संघटने द्वारे ओबीसी जनगणना करा संदर्भात विविध मागण्याचे आंदोलन सुरू असताना "लढा OBC जनगणना 2021"जनगणना 2021 मध्ये VJ/DNT/NT/SBC) चा कॉलम नाही म्हणून आमचा जणगणनेत सहभाग नाही,अश्या अंजलीताईच्या पाटी लावा मोहिमेतील पाट्या "सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला.
1931 साली जात निहाय जनगणना झाली त्याला आधार मानत मंडल आयोगाने 52 टक्के ओबीसींना 27 टक्के आरक्षण दिले, त्या नंतर सरकारने ओबीसीची जनगणना च केली नाही जर संविधान ओबीसींना आरक्षण देते ,340 कलमा नुसार मागासवर्गीय आयोग स्थापन झाले तर सरकार कोणत्या आधारावर ओबीसी साठी धोरण आखातात, जर आज सरकारला ओबीसी चा नेमका आकडाच माहीत नाही.

2021 ला परत सरकारने ओबीसी ची जनगणना डावलली असून डॉ ऍड अंजलीताई साळवे ह्यांनी ओबीसी लढा न्यायालयात,संसदेत,आणि विधिमंडळ ठरावा पर्यंत नेला, पाटी लावा जनजागृती व असहभाग मोहिमेतुन ताई घराघरात पोहचल्या,ह्या मोहिस मराठा सेवा संघ व भूमिपुत्र सेनेने उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला असून अंजलीताई ची पाटी लावा मोहीम घराघरात पोहचवून समाज जागृती चे काम मोठया प्रमाणात मराठा सेवा संघ व भूमीपुत्रानद्वारे चंद्रपूर जिल्ह्यात होत आहे,नेहेमी मराठा सेवा संघ व भूमिपुत्र सेना सामाजिक बांधीलकीतून आपला सहभाग नोंदवून कृती करीत असते,ह्याचाच प्रत्यय जिल्हा आंदोलनात दिसला.

पाटी लावा मोहिमेमार्फत जागृती व्हावी ह्या उद्देशाने विवेक खुटेमाटे, भूमिपुत्र सेना कार्यकर्ता / ओबीसी शहर शाखा काँग्रेस कमिटी, चंद्रशेखर भेंडारकर, सूर्यकांत साळवे, दिनेश पारखी तालुका अध्यक्ष मराठा सेवा संघ राजुरा ह्यांनी पाट्या चे फलक घेऊन उपस्थित होत सरकार दरबारी ओबीसीचा आवाज पोहोचविला.