10 दिवस बँका बंद;वाचा कोणकोणते दिवस आहेत ते - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२८ जानेवारी २०२०

10 दिवस बँका बंद;वाचा कोणकोणते दिवस आहेत ते

नागपुर/प्रतिंनिधी:
Banks closed for 10 days साठी इमेज परिणाम
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या संपामुळे शुक्रवारपासून सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे गुरुवारपर्यंत ग्राहकांना बँकेची कामं उरकावी लागतील.

१ फेब्रुवारी रोजी पहिला शनिवार असल्याने बँकांसाठी तो कामकाजाचा दिवस आहे. याच दिवशी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे, मात्र बँक कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत. त्यामुळे शुक्रवार ते रविवार असे सलग तीन दिवस बँकिंग सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांनी दोन दिवस संपाची हाक दिली आहे. 

३१ जानेवारीला देशव्यापी संपाची घोषणा 
३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारीला देशव्यापी संप आहे.
२ फेब्रुवारीला रविवार असल्याने सलग ३ दिवस बँका बंद राहणार आहेत. 

पगारवाढीच्या मागणीसाठी बँक कर्मचारी संघटना आक्रमक

यामुळेच बॅंकेचा संप करण्यासाठी कर्मचारी संघटना आक्रमक

यासोबत 8,9,16,19,21,22,23,फेब्रुवारीला बॅंक बंद असणार आहे त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात जर काही काम असतील तर ते काम लवकरात लवकर आटोपून घ्या.