चंद्रपुर:4 वर्षीय चिमुरड्याची हत्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२७ जानेवारी २०२०

चंद्रपुर:4 वर्षीय चिमुरड्याची हत्या

पवन झबाडे/ ललित लांजेवार:चंद्रपूर
चंद्रपूर जिल्हा मुख्यालया पासुन काहिच अंतरावर असलेल्या वरवट गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीय.

मामा आणि भाच्याचं नातं हे प्रेम आणि आपुलकीचं नातं समजलं जातं. या नात्याला एका नराधमाने कलंक लावलाय.

 शहरालगत दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 4 वर्षीय चिमुरड्याची हत्या झाल्याने खळबळ उडालीय. दिक्षांत कावडे असं त्याचं नाव आहे. वरवट या गावी घराच्या अंगणात दिक्षांत खेळत होता. त्याच्या नात्यातील मामाने अवजड काठीने डोक्यावर प्रहार करत त्याची हत्या केली. रंगनाथ गेडाम असं त्या हल्लेखोर मामाचं नाव आहे.

घटनेनंतर ग्रामस्थांनी आरोपी रंगनाथ गेडाम(40) याला पकडून बांधलं आणि त्याची धुलाई केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचत आरोपीला घेतलंय. मुलाचे शव जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आलंय.

 मात्र हत्येचं नेमकं कारण काय होतं याचा अजुनही उलगडा झालेला नाही.मामा हा मनोरुग्ण असल्याची माहिती मिळतेय. दिक्षांत खेळत असताना रंगनाथ तिथे आला आणि त्याने काठीने जोरात त्याच्या डोक्यात मारलं आणि तो जागेवरच ठार झाला.