चंद्रपूरच्या डाक्युमेंटरीला 1 लाखाचे पहिले बक्षीस - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२९ जानेवारी २०२०

चंद्रपूरच्या डाक्युमेंटरीला 1 लाखाचे पहिले बक्षीस

पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल मध्ये चंद्रपूरला पहिल्यांदाच पुरस्कार


चंद्रपूर- देशासह संपूर्ण जगात अत्यंत प्रतिष्ठेचा आणि भव्य असणारा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल नुकताच संपन्न झाला. त्यात जगभरातून 109 सिनेमे स्पर्धेसाठी आले होते. यावर्षी ट्रायबल रिसर्च एंड ट्रेनिंग इंस्टिट्यूट(टीएटीआय) ने पहिल्यांदाच आदिवासी गटात डाक्युमेंटरी या फेस्टिवल मध्ये मागविल्या होत्या. या गटातून चंद्रपूरला 1 लाख रुपयांचे पहिले पारितोषिक मिळाले आहे. द मायटी गोंडस् ब्रीक्स ऑफ चांदागड ही सात मिनीटांची डाक्युमेंटरी चंद्रपूरचे विप्लव सुभाष शिंदे यांनी दिग्दर्शित केली असून डाक्युमेंटरीचे लेखन आणि शोध मुकेश वाळके यांनी केले आहे. तर चित्रिकरण प्रणव जैन व संकलन अभिषेक पवार यांचे आहे.

ही डाक्युमेंटरी मुंबईच्या यशवंतराव इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये ही दाखविण्यात आली असून येणा-या नागपुर ऑरेंट सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवल मध्ये सुध्दा दाखविण्यात येणार आहे. उल्लेखनिय असे की, पुण्याच्या टीएटीआय ने या डाक्युमेंटरीचा विशेष स्क्रीनींग आग्रह केला आहे.
पुणे येथील दिमाखदार सोहळ्यात प्रसिध्द दिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल, अभिनेते मोहन आगाशे, विक्रम गोखले आणि थ्री इडियटस्, पद्मावत चे ध्वनी निदेशक बिस्वदीप चॅटर्जी यांच्या उपस्थितीत मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि रोख अशा स्वरुपात हा पुरस्कार विप्लव सुभाष शिंदे यांनी स्वीकारला. येथे आल्यावर त्यांनी अनौपचारिक चर्चेत सांगितले की, गोंड राज्य, त्यांच्या राजवंशाचे अनुपम स्थापत्य आणि स्मारकांचा गौरवशाली इतिहासाचा मागोवा या डाक्युमेंटरीमध्ये घेण्यात आला आहे. विप्लव यांच्या अ लिफ्ट स्टोरी या शॉर्टफिल्म ला अमेरिका, टोकियो व लंडन येथे नॉमिनेशन व पुरस्कार मिळाला होता, हे विशेष।़
द मायटी गोंडस्-ब्रीक्स ऑफ चांदागड या डाक्युमेंटरी करिता माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम, इतिहासतज्ञ दत्ता तन्नीरवार, प्रा. धिरज सेडमाके, प्रशांत आर्वे, आशिष देव यांचे मार्गदर्शन लाभले असून डेबू सावली वृध्दाश्रम चे सुभाष शिंदे, बंडू धोतरे, निकुंज शिंदे, सचिन पांढरे यांचे मोलाचे सहकार्य मिळाल्याचे विप्लव यांनी सांगितले.