झोपलेल्या माणुसकीला जागे करण्यासाठी युवकांचे 'झोपा' आंदोलन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०४ डिसेंबर २०१९

झोपलेल्या माणुसकीला जागे करण्यासाठी युवकांचे 'झोपा' आंदोलन  • रस्त्याच्या कळेल झोपून केले आगळे वेगळे आंदोलन 

  • तेलंगणात झालेल्या बलात्कार हत्याकांडाचे चंद्रपूर मध्ये उमटले पडसाद 

चंद्रपूर :-  या धावपळीच्या आणि वैज्ञानिक युगात माणूस माणुसकी विसरत चालला आहे .डोळ्या समोर अनेक घटना घडतात पण त्याच्या विरुद्ध आवाज उठविण्याची फुरसद कुणालाच नाही .त्यामुळे झोपेचे सोंग घेतलेल्या या जनतेला जागे करण्यासाठी चंद्रपुरातील जनता कॉलेज चौकातील क्रांतिकारी मंडळी या बॅनर खाली युवकांनी लक्षवेधी आंदोलन केले .
दिल्ली मध्ये घडलेल्या निर्भया बलात्कार प्रकरणानंतर देशातील जनता पेटून उठली होती .प्रसंगी सरकारला ही वेठीस धरले होते .त्यानंतर आशिफा हत्याकांड ही या देशात घडला त्यानानंतर हजारो युवतींवर बलात्कार झाले पण जनता मात्र अजूनही झोपलेली आहे .मी पणाच्या या गर्दीत काही निस्वार्थी युवक युवती समोर येत असतात पण प्रशासनाच्या अडेलतट्टू धरणामुळे अनेक आंदोलन पोलीस बळाचा वापर करून धुळकवून लावतात .या सर्व गोष्टीला आपणच जिममेदर असून या देशातील जनता जात , धर्म ,पंथाच्या चक्रव्यूवात अडकलेली आहे ज्या दिवशी हे चक्रव्यूव्ह तोडून जनतेत अन्याया विरोधात आवाज उठविण्याची इच्छा जागृत होईल ना त्या दिवशी आपल्या समाजातील बलात्कार करणारे निर्दयी हयवन बलात्कार करण्याची नुसती हिम्मत करणेच बंद करणार नाही तर तसा विचार ही त्यांच्या मनात लागली आहे .आपल्याला दुसऱ्याच काय करायचं आपले मूल मुली सुरक्षित आहे ना हा विचार जर या देशातील जनता मनातून काढून टाकेलं त्या दिवशी खऱ्या अर्थाने या बघिनींना न्याय मिळेल असे म्हणत स्थानिक जनता कॉलेज चौक परिसरात रस्त्याच्या बाजूला  अत्यंत शांततेने झोपा आंदोलन करून युवकांनी सर्वनाचे लक्ष वेधले . या आंदोलनाला  मयूर राइकवार, प्रणीत सहारे ,करण अतकरे,निखिल देशमुख,राजेश पोटे, देवेंद्र प्रधान, विशाल बट्टूलवार,गुरप्रीत सिंह गिल,सोनू कटकुरवार, अभी साव, प्रफुल टून्ने,शरद सरपाते, अभिषेक राउत,सोनू कुनपट्टे, कुलदीप कुल्ले,आशीष नैतम, सिद्धार्थ भालेराव इत्यादि युवक  उपस्थित होते।

आंदोलकांना पोलिसांनीं केली दमदाटी 
शांततेत आणि अहिंसक रित्या सुरू असलेल्या आंदोलनाला विर्जन घालण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून करण्यात आला .त्यामुळे काही वेळ आंदोलक व पोलीस कर्मचारी यांच्या मध्ये शाब्दिक वादविवाद ही चालाले