वाघाच्या हल्ल्यात गुराखी जख्मी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०४ डिसेंबर २०१९

वाघाच्या हल्ल्यात गुराखी जख्मी




गुंजेवाही-  वनविकास महामंडळ वन परिक्षेत्र पाथरी अंतर्गत येत असलेल्या कन्हाळगांव येथील वनविकास महामंडळातील बिटात ३-३० दरम्यान प्रभुदास कान्हूजी मसराम रा.कन्हाळगाव यांच्या वर पट्टेदार वाघाने हल्ला करून गंभीर जख्मी केले आहे.त्या इसमाच्या पाठीवर,छातीवर व डाव्या हातावर गंभीर जख्मी केले आहे.हि माहिती वनविभागाला कळताच वनविकास महामंडळ पाथरीचे अधिकारी व वनपरिक्षेत्र वनविभाग सिंदेवाहीचे अधिकारी यांनी मोक्का स्थळावरुन त्या इसमाला प्राथमिक स्वास्थ केंद्र गुंजेवाही येथील दवाखान्यात प्राथमिक इलाज करून त्याला जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे पाठविण्यात आले आहे.पुढील तपास वनविकास महामंडळ परिक्षेत्र पाथरी हे करीत आहेत.