महसूल मंत्र्यांना भूमीहिनांचे सामाजिक न्यायासाठी निवेदन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२१ डिसेंबर २०१९

महसूल मंत्र्यांना भूमीहिनांचे सामाजिक न्यायासाठी निवेदन
प्रतिनिधी / 20 डिसेंबर
नागपूर :  भूमीमुक्ती मोर्चा व बहुजनमुक्ती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने अध्यक्ष प्रदीप अंभोरे यांच्या नेतृत्वात भूमी हिनांच्या सामाजिक न्याय हक्काच्या मागण्यासाठी अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या वन व महसूल जमीन भूमी हक्कावर तात्काळ निर्णय घेण्यात यावा.१२६१  भूमीहीन शेतकरी, शेतमजूर आत्महत्या प्रकरणी चौकशी शासनाच्या महामंडळ, राष्ट्रीय बॅकेतील बचतगट कर्जामुळे हजारोंनी आत्महत्या केली.भूमि हीन आत्महत्या प्रतिबंध साठी त्यांची शासनाने 100% कर्जमाफी करावे. वन विभाग अन्याय थांबवा या मागण्यासह आदी मागण्यासाठी  विधानभवन मोर्चास परवानगी नाकारल्याने यशवंत  स्टेडियम वर धारणा आंदोलन करण्यात आले अखेर आंदोलकांचा  आक्रमक पवित्रा घेतल्यावर पोलिसांनी संघटनेच्या शिष्ट मंडळास निवेदन देण्यास विधानभवनात नेण्यात आले
प्रसंगी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना शिष्ट मंडळ द्वारा निवेदन सादर केले यावेळी भाई प्रदीप अंभोरे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अजा विभाग यांना शासन स्तरीय बैठक घेण्याचे आस्वासन मंत्रीमहोदयांनी दिले शिष्ट मंडळात  लक्ष्मणराव ठोसरें प्रकाश वानखडे शेषराव चव्हाण, मधुकर मिसाळ मुन्ना पराते दिलीप रामटेककर,मोर्चात  हलबा समाज कृती समितीचे अध्यक्ष गोपाल पौनीकर, अमरावतीचे गजनन मोहोड,साहेबराव ताळे जानराव कांबळे भगवान गवई गजनन जाधव सह बुलढाणा अकोला अमरावती जळगांव, औरंगाबाद सह बहुसंख्य आदिवासी,भूमिहीन शेतमजुर कार्यकत्याची आंदोलनात उपस्थिती