सिंदेवाहीत झाडीबोली साहित्य मंडळाची स्थापना - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०३ डिसेंबर २०१९

सिंदेवाहीत झाडीबोली साहित्य मंडळाची स्थापना

    
सिंदेवाही/प्रतिनिधी 
सर्वोदय महाविद्यालय सिंदेवाही येथे दिनांक 01डिसेंबर 2019 रोज रविवारला झाडीबोली साहित्य मंडळ स्थापना सोहळा व कविसम्मेलनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात झाडीबोली साहित्य मंडळ, शाखा- सिंदेवाही ची स्थापना करण्यात आली. हा स्थापना सोहळा मान. आचार्य ना.गो. थुटे, वरोरा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून अरविंदजी जयस्वाल सिंदेवाही, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजन जयस्वाल ब्रह्मपुरी, बापुरावजी टोंगे वरोरा, कुसुमताई अलाम गडचिरोली, डॉ. रवींद्र शेंडे सिंदेवाही, संजयजी येरणे नागभीड, सुरेशजी डांगे चिमूर, बंसीजी कोठेवार पळसगाव जाट,  नरेंद्रजी कन्नाके वरोरा हे मान्यवर उपस्थित होते.  

झाडीबोली साहित्य मंडळाची स्थापना झाल्यानंतर, जि. प. प्राथमिक शाळा, नलेश्वर पं. स. सिंदवाही येथील सहाय्यक शिक्षक श्री. नेतराम सुरेशराव इंगळकर यांच्या मृदगंध या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. पुस्तक प्रकाशनानंतर लगेच निमंत्रित कवींचे कविसंमेलन घेण्यात आले.  निमंत्रित कवींमध्ये प्रमुख पाहुण्यांसह वरोऱ्याचे ईश्वर टापरे, संजय जांभुळे,  चिमूरच्या कु. लीना ताई भुसारी, भद्रावतीचे सु.वि. साठे, सौ. ज्योतीताई सरस्वती, प्रविण आडेकर, चंद्रपूरचे किशोरकुमार बोरीकर, गजानन माद्यसवार, बल्लारपूरचे सुनील बावणे, ब्रह्मपुरीचे राजू भागवत यांच्यासह संतोष मेश्राम, सरिताताई गोडे, दुर्गा ठाकरे अशा जवळपास 30 कवींनी विविध विषयांवरील आपल्या आशयपूर्ण आणि बहारदार कवितांचे सादरीकरण केले.           कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी झाडीबोली साहित्य मंडळ शाखा- सिंदेवाहीच्या नवनियुक्त कार्यकारिणीचे अध्यक्ष श्री. नेताजी सोयाम, सचिव श्री. बेनिराम ब्राह्मणकर, यांच्यासह जयंत लेंझे, अनिल अवसरे, नेतराम इंगळकर, सुनील उईके, दीपक मोटघरे, पवन मोहूर्ले, संतोष मेश्राम, अनिल कोडापे, भावनाताई गुंडमवार, सरिताताई गोडे तसेच पंचायत समिती सिंदेवाहीतील अनेक शिक्षक बंधू भगिनींनी आर्थिक मदतीसह सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन अनिल अवसरे, प्रास्ताविक नेताजी सोयाम, कविसंमेलनाचे सूत्रसंचालन सारिताताई गोडे व भावनाताई गुंडमवार तर आभारप्रदर्शन बेनिराम ब्राह्मणकर यांनी केले.