येवल्यात भव्य-दिव्य शिवसृष्टीसाठी वाढीव निधी द्या: पांडुरंग शेळके पाटील #shivjayanti - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२८ डिसेंबर २०१९

येवल्यात भव्य-दिव्य शिवसृष्टीसाठी वाढीव निधी द्या: पांडुरंग शेळके पाटील #shivjayanti
येणाऱ्या 19 फेब्रुवारीच्या शिवजयंती पर्यंत कामाला सुरुवात करा


येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार
 येवला: तालुक्‍यात भव्य शिव सृष्टी उभी रहावी हे येवला तालुक्याचे नव्हे तर तमाम शिवप्रेमींच स्वप्न आहे हेच स्वप्न राज्याचे मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पूर्ण करणार असल्याचे त्यांनी आज मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक तसेच पत्रकार पांडुरंग शेळके पाटील यांना सांगितले आहेत या संदर्भाचे निवेदन देखील पांडुरंग शेळके पाटील यांनी मंत्री भुजबळ यांना दिले आहेत या निवेदनात म्हटले आहे की साहेब आपण येवला शहरात भव्यदिव्य शिवसृष्टी उभारणार आहेत यासाठी चार कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर झाल्याचे आपण सांगितले परंतु हा निधी भव्यदिव्य शिवसृष्टी साठी अपुरा पडेल यासाठी आपण निधी वाढवून द्यावा हा निधी किमान 20 कोटी व जास्तीत जास्त पन्नास कोटी पर्यंत उपलब्ध करून द्यावा त्यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज भव्य पुतळा महाराजांचा इतिहास आणि त्यात एक भव्य वाचनालय महाराजांनी गाजवलेला इतिहास यांची दाखले देणारी अनेक उदाहरणं आपण या शिवसृष्टी तून दाखवू शकतो म्हणून आपण हा निधी वाढवून द्यावा तसेच 19 फेब्रुवारी 2020 पर्यंत शिवसृष्टी चे काम चालू करावेत आणि लवकरात लवकर पूर्ण करून शिवप्रेमींच्या स्वप्नातील शिवसृष्टी उभी करावी अशी या निवेदनातून मागणी करण्यात आली आहेत तसेच मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की आपण काळजी करू नका आपल्या स्वप्नातील भव्यदिव्य शिवसृष्टी होणार म्हणजे होणारच आणि यासाठी निधीची देखील कुठल्याही पद्धतीने कमतरता पडू देणार नाही असेदेखील मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहेत.
"येवल्यात तालुक्यात भव्य दिव्य शिवसृष्टी उभी राहावी ही येथील शिवप्रेमींची इच्छा आहेत यासाठी काही प्रमाणात निधी देखील उपलब्ध झाला आहे परंतु हा निधी अपुरा आहेत किमान 20 कोटी तर जास्तीत जास्त 50 कोटी रुपये या शिवसृष्टी साठी मिळाले पाहिजे तेव्हाच भव्य दिव्य अशी शिवसृष्टी उभी राहील या कामाची सुरुवात येणाऱ्या शिवजयंती पर्यंत चालू झाले पाहिजे ही देखील विनंती"
- पांडुरंग शेळके पाटील
समन्वयक मराठा क्रांती मोर्चा येवला.