इंदिरा गांधी विद्यालय पालेबारसाचे सुयश - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२७ डिसेंबर २०१९

इंदिरा गांधी विद्यालय पालेबारसाचे सुयश



सावली / प्रतिनिधी 
जुबली हायस्कूल चंद्रपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये इंदिरा गांधी विद्यालय पाले बारसा येथील प्राजक्ता पांडुरंग कोरंगधावार या विद्यार्थिनीच्या सगुणा राईस तंत्र या विज्ञान प्रतिकृतीला बिगरआदिवासी गटात तिसरा क्रमांक प्राप्त झालेला असून तिच्या प्रतिकृतीची निवड राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनी करता झालेली आहे ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थिनीच्या या यशाबद्दल तिचे व तिच्या मार्गदर्शक शिक्षिका शीला ताजने यांचे सर्वत्र कौतुक होत आहे संस्थेचे सचिव डॉक्टर केशव शेंडे प्राचार्य विलास लोखंडे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.