शासकिय धान खरेदी केन्द्र त्वरीत सुरू करा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१५ डिसेंबर २०१९

शासकिय धान खरेदी केन्द्र त्वरीत सुरू करा


पाथरी : - सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे विदर्भ मार्केटिंग फेडरेशन अंतरर्गत विविध कार्यकारी सोसायटी व्याहाड खुर्द यांचेकडे कित्येक वर्षे पासुन शासकिय धान खरेदी  केन्द्र मंजुर आहे आपल्या परिसरामध्ये मोठया प्रमानामध्ये उच्च प्रतिच्या धानाची लागवड होते साधारन धानाची लागवड आपल्याकडे होत नाही . शासनामार्फत मंजुर होनारे दर उच्चप्रतिच्या धानापेक्षा कमी असतात परंतु आज केन्द्र शासनाने स्वामीनाथन आयोगाचा शिपारसी नुसार हमीभावामध्ये थोडऱ्या प्रमाणात वाढ केली त्यामुळे यावर्षी धानाला 1815 रू हमी भाव व राज्य शासना मार्फत प्रति क्विंटल 500रू बोनस असा प्रकारे 2315रू धानाला भाव आहे . व व्यापाऱ्या मार्फत शेतकऱ्यांना 1800रूच्या भाव मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी शेतकऱ्यांची पिळवणुक थांबविण्यासाठी व्याहड खुर्द येथे शासकिय धान खरेदी केन्द्र त्वरीत सुरू करावी अशी मागणी पं . स . उपसभापती तुकाराम पा . ठिकरे , अशोक ठिकरे , प्रशांत बोरकर , सुरेश सुरपाम , अनिल मोहुर्ले , बबनजी बोरसरे , तेजराम बावनवाडे , अभिमण्यु सेडमाके , यांनी केली आहे