जुन्नर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षांचा राजीनामा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१३ डिसेंबर २०१९

जुन्नर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षांचा राजीनामा
जुन्नर /आनंद कांबळे 
जुन्नर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा अलकाताई फुलपगार यांनी उपनगराध्यक्षापदाचा राजीनामा दिला.
 राष्ट्रवादी पक्षाच्या सूचनेनुसार अलकाताई फुलपगार यांनी उपनगराध्यक्षा पदाचा राजीनामा नगराध्यक्ष शाम पांडे यांच्याकडे दिला .यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते दिनेश दुबे हे उपस्थित होते.

राष्ट्रवादी पक्षाचे नेते व आमदार अतुल बेनके यांच्या सूचनेनुसार त्यांनी राजीनामा दिला आहे.
याबाबत अलकाताई फुलपगार यांनी सांगितले की,पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवून ३वर्षे काम करण्याची संधी दिली त्याबद्दल समाधान व्यक्त केले.

  उपनगराध्यक्ष पदासाठी पक्षाने नगरसेवकांचे मत जाणून घेतलेले आहे. नगरसेवक भाऊ कुंभार व फिरोजभाई पठाण  यापदासाठी इच्छुक आहेत असे गटनेते दिनेश दुबे यांनी सांगितले .
 जुन्नर नगरपालिकेचे नगराध्यक्ष हे शिवसेनेचे आहेत तरीसुद्धा राष्ट्रवादी पक्षाकडे १२नगरसेवक आहेत. राष्ट्रवादीचे ८ तर जमीरभाई कागदी गटाचे ४ नगरसेवक आहेत.

 १)जुन्नर नगरपालिकेचे उपनगराध्यक्षपदी जुन्नर  तालुक्याचे आमदार अतुल बेनके  कोणाला  संधी देणार याबाबत उत्सुकता आहे  २) मुस्लीम समाजाचे नेते म्हणून फिरोजभाई  पठाण आहेत तर भाऊ कुंभार हे आमदारांचे विश्वासू सहकारी आहेत.