दिव्यांग महिलेवर अतिप्रसंग करून हत्या - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०७ डिसेंबर २०१९

दिव्यांग महिलेवर अतिप्रसंग करून हत्या
बुलढाणा/प्रतिनिधी 
 जिल्ह्यात हैदराबाद घटनेची पुनरावृत्ती जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा येथे ५५ वर्षीय दिव्याग महीलेवर अतिप्रसंग करून हत्या करण्यात आली. 

विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटनेने परिसरात खळबळ उडवून टाकली वासना दिन नराधमांनी एका युवतीस निर्वस्त्र अवस्थेत फेकून तिच्यावर पाशवी बलात्कार केल्याचा प्रथम दर्शनीय अंदाज व्यक्त होत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील खेर्डा येथे आज सकाळच्या सुमारास  एका दिव्याग अविवाहित ५५ वर्षीय महिलेचे निर्वस्त्र अवस्थेत प्रेत मिळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली सदर महिला ही खेर्डा येथील लिलाबाई खरात मेंढपाळ असून तिच्या पोटात तीक्ष्ण हत्याराने वार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली सदर महीलेची दि ७ डिसेंबर च्या रात्री हत्या करून प्रेत निवस्त्र अवस्थेत फेकून देण्यात आले आहे आमच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर विवाहीत महीलेवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची माहिती घटनेवरून समजत आहे. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पुढील तपास करीत आहेत.