दोन दिवसात साडेतीन लाखांचा मोहसडवा जप्त - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०२ डिसेंबर २०१९

दोन दिवसात साडेतीन लाखांचा मोहसडवा जप्त*सिंदेवाही पोलिसांची कारवाई*

सिंदेवाही : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असतानासुद्धा अवैध दारू विक्रेत्यांनी डोकेवर काढले असून देशी दारूसह मोहफुलाची दारूदेखील मोठ्या प्रमाणात अवैधपणे विकली जात आहे. या अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध सिंदेवाही पोलिसांनी धडक मोहीम सुरू करून आतापर्यंत अनेकांना अटक केली. नुकतीच सिंदेवाही तालुक्यातील सावरगाव येथे २९ व ३० नोव्हेंबर रोजी जंगल परिसरात धाड टाकून दोन आरोपींसह मोहफुलाचा सडवा तसेच इतर साहित्य असा एकूण ३ लाख ५० जार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या धडक कार्यवाहीमध्ये युवराज रामकृष्ण तरारे रा. सावरगाव याला २ लाख रुपयाचा मुद्देमालासह अटक करण्यात आली असून, दुसऱ्या धाडीत सावरगाव येथीलच आनंदराव ठाकरे याला १ लाख ५० हजार रुपयाच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली. ही कार्यवाही सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनात हवालदार चंपत डोंगरे, लाकडे व ईश्वर गेडाम यांनी केली.