कोसा उद्योगातून पाथरी सिल्क नावारुपास यावे- अॅङ. पारोमिता गोस्वामी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१० डिसेंबर २०१९

कोसा उद्योगातून पाथरी सिल्क नावारुपास यावे- अॅङ. पारोमिता गोस्वामी
पाथरी येथे कोसा उत्पादकांचा मेळावा

पाथरी/प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्यातील रानावनात राहून कोसा उत्पादन करणाऱ्या ढीवर समाजाच्या आर्थिक उन्नतीत आजही कोणताही बदल झालेला नाही. पाहिजे तसा आर्थिक मोबदला मिळत नसल्याने रेशीम उद्योग बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. या उद्योगाकडे शासनाने लक्ष दिल्यास कोसा उत्पादन, धागा निर्मिती आणि कापड उद्योग सुरू होऊन पाथरी सिल्क नावारुपास येइल, यातून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील रानकरी बांधवांना मोठा रोजगार निर्माण होइल, अशी आशा आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्र राज्य समिती सदस्य ऍड पारोमिता गोस्वामी यांनी व्यक्त केली.

श्रमिक एल्गार तथा आम आदमी पार्टी चंद्रपूर (ब्रम्हपुरी निर्वाचन क्षेत्र) रान धरणा-यांचा मेळावा ( कोसा उत्पादकांचा मेळावा ) मंगळवार, दि. 10 डिसेंबर रोजी संत तुकाराम कनिष्ठ कला महाविद्यालय, पाथरी येथे पार पङला. 
यावेळी मंचावर रेशिम विभागाचे अधिकारी आव्हाङ, उइके, श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष विजय सिद्धावार, कासूबाई मेश्राम, होनाजी कांबळे, रामाजी वैरकार, प्रल्हाद मेश्राम यांची उपस्थिती होती. 
पाहुण्यांनी ङाॅ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत शिरोमणी वाल्मिकी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. 
पाथरी परिसरात कोसा उत्पादकांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे.  त्यांच्या प्रश्नांवर व समस्यांवर विचार विनिमय करुन व्यवसायाला व संरक्षण देण्यासाठी व मदत करण्यासाठी पहिल्यांदाच रान धरणाऱ्यांचा (कोसा उत्पादकांचा )  आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता.  
या प्रसंगी अॅङ. पारोमिता गोस्वामी म्हणाल्या, यंदाच्या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. त्या नुकसानीची पाहणी करीत असताना रानातील कोसा उत्पादकांचेही नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. शेतीप्रमाणे कोसा उत्पादकांना नुकसान भरपाईची तरदूत नाही. त्यामुळे उत्पादकांना फटका सहन करावा लागला. संयुक्त वनव्यवस्थापन समिती निर्बंध घातल असल्याने कोसा उत्पादन घेण्यात अडचण निर्माण होत आहे. या समस्या दूर करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करू, असे आश्वासन त्यांनी दिले.  
पाथरी येथे कोसा उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढून दर्जेदार कापड निर्मिती व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी होनाजी कांबळे, रामाजी वैरकार, प्रल्हाद मेश्राम, माया सुरपाम या कोसा उत्पादकानी आपल्या व्यवसायातील अडचणी सांगितल्या. यावेळी रेशीम अधिकारी उइके यांनी समस्यांचे निराकरण केले. 
कार्यक्रमाचे संचालन अनिल मडावी यांनी केले. तर आभार प्रदर्शन घनशाम मेश्राम यांनी केले. आयोजनाकरिता शशिकांत बतकमवार, शांताराम आदे, विशाल नर्मलवार, संगिता गेङाम,  शितल वाङगुरे, बाळकृष्ण दुमाने यांनी सहकार्य केले.