बाल साहित्य संमेलनात मोहित सहारे यांचा कार्याचा गौरव - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१५ डिसेंबर २०१९

बाल साहित्य संमेलनात मोहित सहारे यांचा कार्याचा गौरववर्धा - जिल्ह्याला महात्मा गांधी जिह्याचा वारसा लाभला आहे.याच गांधी जिल्ह्याने अनेक लोक घडविले.या जिल्ह्यात ऐक ध्येयवेडा युवक हा आपल्याला कार्याने सर्वांचे मन मोहित करण्याचे काम करत आहे.गेल्या तीन वर्षांपासून आर्वी नाका येथे वडार वस्तीत फूटपाथ स्कूल च्या माध्यमातून वंचित घटकातील मुला मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोहित चे कार्य सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या महात्मा गांधी यांच्या १५० जयंती निमित्याने विदर्भ साहित्य संघ व स्कूल ऑफ स्कॉलर वर्धा च्या वतीने आयोजित विदर्भ साहित्य संघाचे ६ वे विदर्भ स्तरीय बाल साहित्य संमेलन वर्धा येथे पार पडले. या संमेलनात संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध चित्रकार मा.श्री चंद्रकांत चन्ने, उद्घाघाटक म्हणून सुप्रसिद्ध लेखक व अभिनेते मा.श्री.चिन्मय मांडलेकर,कुलगुरू.डॉ. राजीव बोरले(,द.मे.आ.अ. वि),स्वागताध्यक्ष आभा मेघे (संचालक,मेघे ग्रुप ऑफ स्कूल,मुख्य संयोजक संजय इंगळे तिगावकर,निमंत्रक शुभदा फडणवीस (वि.सा.संघ),शाखा सचिव प्रदीप दाते यांच्या प्रमुख उपस्थिती शाँल,सन्मानचिन्ह,पुस्तक,रोपटे देऊन मोहित सहारे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मोहित यांने सांगितले की हा सन्मान माझं नसून माझ्या सोबत काम करणाऱ्या माझ्या संपूर्ण टीम चा आहे.यावेळी मोहित सोबत त्याचे सहकारी पंकज गावंडे,हर्षाली बोरसरे,अंकित बारंगे, वैष्णवी सहारे उपस्थित होते.