मेट्रो स्टेशन वर व्यावसायिक प्रतीष्टांना करिता जागा उपलब्ध - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०५ डिसेंबर २०१९

मेट्रो स्टेशन वर व्यावसायिक प्रतीष्टांना करिता जागा उपलब्ध


सिताबर्डी,जय प्रकाश नगर,एयरपोर्ट,एयरपोर्ट साऊथ,न्यू एयरपोर्ट, खापरी येथे जागा उपलब्ध


नागपूर ०५ : महा मेट्रोच्या नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या रिच – १ सिताबर्डी इंटरचेंज ते खापरी स्टेशनच्या दरम्यान दररोज  सकाळी ८.०० वाजता पासून रात्री ८.०० वाजता पर्यंत दर १५ मिनिटांनी होणाऱ्या फेऱ्यांचे संचालन केल्या जात आहे. प्रवासी सेवा सुरु झाल्या नंतर महा मेट्रोने आता नॉन फेयर बॉव्स रेव्हेन्यूवर लक्ष केंद्रित केले आहे. उल्लेखनीय आहे की, वर्धा मार्गाशी संलग्न सिताबर्डी,अजनी,राहाटे कॉलोनी,बेसा-बेलतरोडी, मनीष नगर, खापरी, मिहान येथील रहीवासी तसेच औद्योगिक वसाहती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या मार्गावर सतत रहदारी असते.

महा मेट्रोने प्रकल्पाच्या सुरुवातीपासूनच नॉन फेयर बॉव्स रेव्हेन्यूवर लक्ष केंद्रित केले असून छोट्या-छोट्या बाबींचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. रिच-१ येथे प्रवासी वाहतूक सुरु करण्यात आली असून सिताबर्डी,जय प्रकाश नगर,एयरपोर्ट,एयरपोर्ट साऊथ,न्यू एयरपोर्ट, खापरी मेट्रो स्टेशन नागरिकांन करीता सुरु करण्यात आली आहे. महा मेट्रोने या मेट्रो स्टेशन येथे मोठ्या प्रमाणात दुकान आणि ऑफिस करीता व्यावसायिक क्षेत्र उभारले असून सदर जागा आता नागरीकांन करीता उपलब्ध करून देण्यात येत आहे आहे. ज्याकरीता महा मेट्रोने निविदा मागविल्या आहे.    

महा मेट्रोने उपलब्ध करून दिलेल्या व्यावसायिक क्षेत्राचा तपशील पुढील प्रमाणे :

खापरी मेट्रो स्टेशन ४०० चौ.मी.
न्यू एयरपोर्ट स्टेशन ११०० चौ.मी.
एयरपोर्ट स्टेशन १२०० चौ.मी.
जयप्रकाश नगर २१०० चौ.मी.

तसेच महा मेट्रोने लहान दुकानदारांकरिता १००० फुट पेक्षा कमी जागा उपलब्ध करून देण्याकरिता निविदा मागविल्या आहे. मागविण्यात आलेल्या निविदा चा कालावधी ९ वर्षाचा असून ६ वर्षा करिता मुदत वाढ देण्यात येईल. तसेच महा मेट्रोद्वारे मेट्रो स्टेशन परिसर येथे जाहिरातीचे हव्क ३ वर्षाच्या कालवधीकरिता निविदा मागविल्या असून संबंधित व्यावसायिकांनी याचा लाभ घ्यावा तसेच मागविण्यात आलेल्या निविदा करीता कुठल्याही मध्यस्थची नेमणूक करण्यात आली आली नाही.तसेच निविदेच्या संबंधातील विस्तुत माहिती करिता महा मेट्रोच्या संपती विभागाशी (मेट्रो भवन,दीक्षाभूमी समोर) संपर्क करावा असे आवाहन महा मेट्रो तर्फे करण्यात आले आहे.