आज मराठा क्रांती मोर्चा व मराठा क्रांती ठोक मोर्चा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१५ डिसेंबर २०१९

आज मराठा क्रांती मोर्चा व मराठा क्रांती ठोक मोर्चाकोपर्डीप्रकऱणी आरोपींना तत्काळ फाशी द्या मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी

नागपूर (दिनांक. 15 डिसेंबर )
मराठा क्रांती मोर्चा व ठोक मोर्चा  यांच्यावतीने समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाजातर्फे केलेल्या आंदोलनादरम्यान युवकांवर तत्कालीन सरकारकडून दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी सकल मराठा समाजाचे महेश डोंगरे यांनी आज पत्रकार परिषद मध्ये केले. मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यात या मागणीसाठी केलेल्या आंदोलनात हे झालेल्या कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी देण्यात यावी. याशिवाय मागील सरकारने जाहीर केलेली मदत देण्यात यावी. कोपर्डी प्रकरणातील आरोपींना सत्र न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाला कायम ठेवण्यासाठी सरकारने तज्ञ वकील नेमावा अशी मागणी केली असल्याचे ते म्हणाले. या संदर्भात सकल मराठा समाजाचे शिष्टमंडळ मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना भेटणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी पत्रपरिषदेत उमेश घाडगे, साहेबराव देशमुख उमेश निकम, सागर रणनवरे, जितेंद्र खोत, प्रकाश जाधव आणि भगवान माखने यावेळी उपस्थित होते.