कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशन : प्लॅटफॉर्मचे कार्य प्रगतीपथावर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१७ डिसेंबर २०१९

कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशन : प्लॅटफॉर्मचे कार्य प्रगतीपथावर

• कामठी रोडवरील महत्वाचे स्टेशन ठरणार कस्तुरचंद पार्क

*नागपूर १६ : नागपूर शहराच्या प्रमुख एतिहासिक स्थळ सिताबर्डी किल्ल्याच्या मुख्य प्रवेश द्वारच्या जवळ कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशनचे निर्माण महा मेट्रो द्वारे जलद गतीने केल्या जात आहे. महा मेट्रोच्या नागपुर मेट्रो रेल प्रकल्पाच्या रिच २ मधील सीताबर्डी इंटरचेंज पासून हे दुसऱ्या क्रमांकाचे स्टेशन आहे. केपी ग्राउंड जवळ एतिहासिक गौरवशाली परंपरा नुसार या स्टेशनचे निर्माण कार्य केल्या जात आहे. प्राचीन कलाशैली च्या आधारावर या मेट्रो स्थानकांची इमारत किल्या सारखी असेल, जे खूप आकर्षक असेल. 

कस्तुरचंद पार्क मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म चे निर्माण कार्य सुरु असून , मेट्रो ट्रेनच्या  दोन्ही बाजुंचे रूळ टाकण्याची तैयारी पूर्ण करण्यात आली आहे. तसेच इलेक्ट्रिक कार्य देखील सोबत केल्या जात आहे. या स्थानकाच्या प्लॅटफॉर्मची लांबी ९५.२५ मीटर आहे.  प्लॅटफॉर्म  निर्माण कार्य सोबतच यात्री सुविधा संबंधीचे कार्य देखील सुरु करण्यात आले आहे. उल्लेखनीय आहे कि नागपूर मेट्रो रेल प्रकल्पा अंतर्गत येणारे सर्व मेट्रो स्टेशनचे डीजाईन एकाहून एक आहे. सदर मेट्रो स्टेशन सीताबर्डी किल्या जवळ असल्या कारणाने या स्थानकांची वास्तुकला किल्या सारखी बनविण्यात आली आहे. या वास्तू मध्ये प्राचीन कला आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम या ठिकाणी बघायला मिळणार . के.पी. मेट्रो स्टेशन सीताबर्डी किला,विधान भवन,रिजर्व बँक,आकाशवाणी,रेल्वे स्टेशनच्या पश्चिमी द्वार पासून जवळ असल्याने  प्रवाश्यांना फायदेशीर ठरेल.