येळकोट....येळकोट..जय मल्हारच्या जयघोषात खंडोबाचा जागर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०३ डिसेंबर २०१९

येळकोट....येळकोट..जय मल्हारच्या जयघोषात खंडोबाचा जागरयेवला प्रतिनिधि / विजय खैरनार 
येवला तालुक्यातील अंदरसूलला येळकोट....येळकोट..जय मल्हारच्या जयघोषात खंडोबाचा जागर....

बारा गाड्या उत्सवा दरम्यान भाविकांची अलोट गर्दी दि.(2) येथे चंपाषष्ठी उत्सवा दरम्यानच्या  अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले मार्तंड भैरव खंडोबाचा उत्सव   सालाबादप्रमाणे यंदाही  येळकोट....येळकोट..जय मल्हारच्या जयघोषात भंडाऱ्याची उधळण करीत खंडोबाचा जागर....मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.गेल्या सहा दिवसांपासून येथील ग्रामदैवत असलेल्या खंडोबा मंदिरात मार्तंड भैरव षडरात्रौस्तव आयोजित करण्यात आला होता त्यात प्रतिदिन जागर करण्यात आला.चंपाषष्ठीच्या दिवशी सकाळी पालखी व बारा गाडयाचे विधिवत पूजन मान्यवर भाविकांच्या उपस्थितीत करण्यात आले  येळकोट.... येळकोट...जय मल्हार च्या जयघोषात  दुपारी दोन वाजता गांवातुन सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली सायंकाळी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी परिसरातील अबाल-वृद्ध व महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती  भाविकांच्या येळकोट..येळकोट..जय मल्हारच्या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमला याप्रसंगी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.