महापौरांनंतर उपमहापौरांचेही जाहिरात फलक हटविले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ डिसेंबर २०१९

महापौरांनंतर उपमहापौरांचेही जाहिरात फलक हटविले
भांडेवाडी येथील अवैध होर्डींगवर कारवाई

नागपूर, ता. ५ : अवैधरित्या शहरात कुठेही होर्डींग लावून शहर विद्रुप करणा-यांविरोधात कारवाई दरम्यान काही दिवसांपूर्वी महापौरांचे होर्डींग हटविण्याची कारवाई मनपातर्फे करण्यात आली. महापौरांचे होर्डींग हटविल्यानंतर गुरूवारी (ता.५) उपमहापौरांचेही जाहिरात फलक हटविण्याची कारवाई नागपूर महानगरपालिकेच्या पथकाद्वारे करण्यात आली.शहरातील अवैध होर्डींगबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाद्वारे सक्त कारवाईचे आदेश देण्यात आले आहे. या आदेशानुसार संपूर्ण शहरात अवैध होर्डींग काढण्यात येत आहेत. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार ३ डिसेंबरपासून अवैध होर्डींग काढण्याची धडक कारवाई सर्वत्र सुरू आहे. या कारवाईदरम्यान उपमहापौर मनिषा कोठे यांचे अभिनंदन करणारे होर्डींगवरही कारवाई करण्यात आली. भांडेवाडी येथील पाण्याच्या टाकीजवळ झाडांना लावण्यात आलेल्या उपमहापौरांच्या होर्डींगवर गुरूवारी (ता.५) बुलडोजर चालविण्यात आले.

उपमहापौरांनी अवैध होर्डींगबाबत केलेल्या कारवाईचे समर्थन करीत मनपा पथकाचे अभिनंदन केले. अवैध होर्डींगमुक्त शहर करून आपले शहर स्वच्छ, सुंदर होण्यासाठी अशी कारवाई सर्वत्र आवश्यक आहे. मनपातील सर्व पदाधिका-यांनीही या कारवाईमध्ये पथकाला सहकार्य करावे, असे आवाहनही उपमहापौर मनिषा कोठे यांनी केले आहे.