अंधश्रध्दा निर्मूलन व शिक्षणाच्या प्रसारासाठी जीवनकार्य समर्पित - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२० डिसेंबर २०१९

अंधश्रध्दा निर्मूलन व शिक्षणाच्या प्रसारासाठी जीवनकार्य समर्पित
जुन्नर  /आनंद कांबळे 
समाजातील सर्वसामान्य माणसे अंधश्रद्धा  धार्मिक कर्मकांडात अडकली असताना त्यावर  कठोर प्रहार करण्याचे धारिष्ट्य संत गाडगे महाराजांनी  दाखविले. त्यांनी अंधश्रध्दा निर्मूलन व शिक्षणाच्या प्रसारासाठी आपले जीवनकार्य समर्पित केले.असे प्रतिपादन जुन्नर तालुका परीट सेवा मंडळाचे अध्यक्ष सुभाष दळवी यांनी केले

.जुन्नर शहर परीट सेवा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

नगरसेवक भाऊसो कुंभार , नगरसेविका आश्विनी गवळी ,लोकनेते  मधुकर काजळे,  मंडळाचे तालुका उपाध्यक्ष दत्ता गवळी, मदन टेंभेकर , जिल्हा सदस्य मनोज नांगरे,सखाराम ससाणे ,ज्ञानेश्वर टेंभे ,शहर अध्यक्ष  भाऊसाहेब गवळी ,उपाध्यक्ष संतोष गवळी,  विजय  बोऱ्हाडे  , सचिव शरद नांगरे ,सहसचिव वैभव ससाणे, खजिनदार मुकेश जाधव,सुहास ससाणे,  माजी अध्यक्ष   पोपट गवळी,कृष्णा गवळी,  बबनराव बोऱ्हाडे ,किसन गवळी, रोहिदास गवळी ,बाळासाहेब  वाकचौरे, हरी रोकडे,भालचंद्र रायकर,आदी मान्यवर यावेळी उपस्थितीत  होते.

पुण्यतिथीच्या औचित्याने गाडगे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन ,मिरवणूक काढण्यात आली .सुभाष महाराज भालेकर  महाराज यांचे गाडगे महाराज यांच्या जीवनचरित्रपर प्रवचनाचा कार्यक्रम संप्पन झाला. 

      तसेच काळभैरवनाथ भजनी मंडळ खाणगाव यांच्या सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम सँप्पन झाला.जुन्नर शहरात परीट समाजासाठी समाज मंदिरासाठी  शासकीय जागा उपलब्ध करण्याचे  आश्वासन नगरसेवक भाऊसो कुंभार यांनी दिले महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. संत गाडगे महाराज वसतिगृहात संप्पन झालेल्या कार्यक्रमास तालुक्यातील परीट समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते.-गाडगे महाराज वसतिगृहाचे वयवस्थापक एस एस चौधरी सर ,गणेश नांगरे ,,शाम गवळी ,प्रशांत गवळी,राजेश गवळी,गणेश गवळी ,,शिरिष ससाणे, संदीप वाकचौरे , आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले.