लोकमान्य टिळक विद्यालयाच्या विद्यार्थिनीची किल्ला सहल - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०५ डिसेंबर २०१९

लोकमान्य टिळक विद्यालयाच्या विद्यार्थिनीची किल्ला सहल


  • आपला ऐतिहासिक वारसा पाहुन विदयार्थिनी भारावल्या
  • स्वच्छता ते किल्ला पर्यटनाच्या साक्षीदार होतायेत शालेय विदयार्थी
  • इको-प्रो व लोकमान्य टिळक कन्या विदयालयाचा संयुक्त उपक्रम

चंद्रपूरः शहरातिल ऐतिहासिक वारसा संरक्षण व संवर्धनाच्या व्यापक जनजागृती व्हावी, आपली भावी पिढी असलेल्या शालेय विदयाथ्र्याना अधिक माहीती व्हावी व प्रत्यक्ष अशा वारसा स्थळांना भेट देता यावी आणि इतिहास जाणुन घेता यावा याकरिता इको-प्रो संस्थेच्या शालेय विदयाथ्र्याची किल्ला भेट व ‘आपला वारसा, आपणच जपुया’ या उपक्रमा अंतर्गत तसेच लोकमान्य टिळक कन्या विदयालय शाळेच्या ‘भुगोल क्षेत्र भेट’ उपक्रम अंतर्गत विदयार्थीनिनी चंद्रपुर शहरातिल ऐतिहासिक गोंडकालिकन किल्ला-परकोटास किल्लास भेट दिली.

लोकमान्य टिळक कन्या विदयालयाच्या मुख्याध्यापिका व शिक्षक यांनी पुढाकार घेतल्याने इको-प्रो च्या सहकार्याने जवळपास 500 अधिक विदयार्थीनीनी एकाच वेळेस किल्लावरून ‘बगड खिडकी ते अंचलेश्वर गेट’ अशी फेरी मारत आपला ऐतिहासिक गोंडकालीन वारसा असलेला किल्ला-परकोट, खिडक्या व गेट तसेच गोंडराजे समाधी स्थळ, अंचलेश्वर मंदीरास भेट देत पाहणी केली. या दरम्यान स्वच्छता पुर्वीची व नंतरची श्रमदानाची काही छायाचित्रे यावेळी दाखविण्यात आली. चंद्रपूरातील ऐतिहासिक वारसा बघुन आणी स्वच्छता ते किल्ला पर्यटनाचा चित्र प्रवास पाहुन आणि प्रत्यक्ष किल्लास भेट देउन, त्यावरून फिरता आल्याने तसेच आपल्या शहरात सुध्दा बरेच काही पाहण्यासारखे आहे मात्र ते अजुन आपण बघितले नव्हते यामुळे आपण वेगळयाच दुनियेत आल्याचा भास विदयार्थिनीना झालेला पाहुन इको-प्रो च्या कार्यकत्र्याना आपल्या कार्याचे चिज होत असल्याचे समाधान झाले.

मोठय संख्येन सहभागी झालेल्या विदयाथ्र्याचे योग्य व्यवस्था, सुरक्षीतरित्या सहल यशस्वी करण्यास शिक्षक-शिक्षिका सौ. एम एम बंडीवार, श्री के व्हो कत्रोजवार, श्री एम बी सालवे, सौ पि डी महादानी, सौ आर के गांवडे, सौ एम एम पनके, सौ ए ए चंदावार, कुमारी पि आर चव्हाण, कुमारी एस टी डोर्लीकर, सौ व्हि व्हि येंगलवार, सौ गळाणे, श्री ए एच डेहनकर, श्री एस टी गावंडे, श्री के यु गोन्नाडे, श्री ए पी कोटनाके आदी शिक्षक-शिक्षिका सहभागी झाले होते. तसेच इको-प्रो तर्फे बंडु धोतरे, रवि गुरनुले, कपील चैधरी, सुधिर देव, राजेश व्यास, संजय सब्बनवार, जयेश बैनलवार, राजु काहीलकर, प्रमोद मलिक, सुमीत कोहळे, अशिष मस्के, गौरव वाघाडे, अमोल उटटलवार, सचिन धोतरे,  स्वप्निल रागिट, मनीषा जैस्वाल यांनी सहकार्य केले.