कांद्याची बोंबाबोंब थांबवा! कांद्याची सत्य परिस्थिती तपासून बोला - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०८ डिसेंबर २०१९

कांद्याची बोंबाबोंब थांबवा! कांद्याची सत्य परिस्थिती तपासून बोला
येवला प्रतिनिधि/ विजय खैरनार
येवला: अतिवृष्टी,पूर आणि खराब हवामानामुळे शेतक-यांचा उन्हाळ कांदा खराब झाला म्हणून बाजारात कांदा विक्रीसाठी उपलब्ध नाही तर दुस-या बाजूला खरीप (लाल) कांदयाचे रोपं सडुन गेली.पुन्हा कांदा बी महागड्या भावात घेऊन तेही खराब झाले, नंतर बी मिळेनासे झाले. जे लाल कांदे लावले गेले ते खराब हवामान आणि पावसामुळे  अनेक फवारण्या, पोषक वापरूनही कांद्याची वाढ होईना.दांड वरम्ह्यावर थोडाफार कांदा  वाढला तो विरळुन शेतकरी ट्रॅक्टर ऐवजी कॅरेटने बाजारात विक्रीसाठी आणत आहे हे वास्तव ग्राहक मिडिया आणि ज्यांच्या डोळ्यात पाणी येते अशा महिलांनी समजून घ्यावे यासाठी शेतकरी संघटनेने एक पत्रक काढुन कांदा प्रश्नाचे वास्तव जनते समोर आणले आहे.कांद्याचे पिक घेण्यासाठी किमान सत्तर ते ऐंशी हजार  रूपये एकरी खर्च येतो, पोळ कांदा उत्पादन एकरी  साधारणपणे पन्नास साठ क्विंटल तर रांगडा आंणि उन्हाळ कांदा उत्पादन एकरी शंभर ते दीडशे क्विंटल एवढे येते हे उत्पादन चांगले हवामान गृहित धरून आहे.
      मागील वर्षी कांदा भाव दोनतीनशे रूपये क्विंटल होते त्यामुळे अनेक शेतक-यांना अर्थिक फटका बसला त्या आगोदरही कांदा भाव कमी होते. अतिवृष्टी, खराब हवामान या आसमानी संकटाचा सामना शेतकरी करत असतांना निर्यात बंदी, निर्यात शुल्कवाढ,बॅन्क कर्ज मिळत नाही  या सारख्या सुलतानी संकटाचा सामना करतकरता कसा जगतो हे "जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे "अशी परिस्थिती झाली आहे. 
     शासनाकडे प्रत्येक पिकाची माहिती असते उत्पादन, एकुण आवश्यकता, हवामानाची परिस्थिती हे सगळं माहित असतांनाही व्यापारी वर्गाला साठा मर्यादा,शेतक-यांच्या कांदा चाळीची पाहणी असे अनावश्यक उपाय करून त्याचा परिणाम शेक-याला कमी भाव मिळण्यात होतो. शासनाला जनतेची एवढी काळजी असेल तर खुल्या बाजारात कांदा खरेदी करून तो खुशाल रेषण कार्डवर वाटावा पण शेतक-याच्या पोटावर पाय देण्याचे थांबवावे.
      या पत्रकात कांदा जीवन आवश्यक यादीतून वगळावा, कारण कांदा खालला नाही म्हणून एकाही व्यक्तीचा मृत्यू झाल्याच ऐकिवात नाही मात्र कांद्याचे भाव पडल्याने शेतकरी आत्महत्या करतात हे आपण कांदा उत्पादक पट्यात अनुभवतो. कोणताही डाॅक्टर कांद्याची कमतरता (Deficiency)झाल्याने तुम्हाला अमुक आजार झाला असे सांगत नसताना कांदा जीवनावश्यक वस्तूंच्या यादित समावेश केल्याचा आरोप या पत्रकात करण्यात आला आहे. 
       सर्व प्रकारचे प्रसारमाध्यमांनी, नोकर वर्गाने कांदा भावाची ओरड थांबवून वास्तव समजून घेऊन जगाचा पोशिंदा असलेल्या शेत-याला सहकार्य करावे. असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते संतु पाटील झांबरे, बापूसाहेब पगारे, जाफरभाई पठाण, अरूण जाधव, शिवाजी वाघ, अनिस पटेल, संध्या पगारे, सुरेश  जेजूरकर,सुभाष सोनवणे, बाळासाहेब गायकवाड, चंद्रभान बोराडे यानी या पत्रकाद्वारे केले आहे.