प्रविणभाऊ आडेपवार विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२२ डिसेंबर २०१९

प्रविणभाऊ आडेपवार विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावानिफंद्रा (ता. सावली)- येथील प्रविणभाऊ आडेपवार माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विदयालयात माजी विदयार्थी मेळाव्याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

यावेळी उपस्थित विद्यार्थ्यानी आपल्या मनोगतातून शिक्षकांबदल कृतघ्नता व्यक्त करीत आपल्या भावना व्यक्त केल्या. वेगवेगळया क्षेञात काम करणा-या माजी विदयार्थ्यानी एकञ येत आपले शालेय पूर्वानूभवाच्या दिवसाबदल भरभरून बोलताना आपल्या शब्दांना वाट मोकळी करून दिली.विदयालयाच्या पंटागणावर नुकत्याच पार पडलेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष गजानन पाचंलवार,प्रमूख अतिथी शाळा व्यवस्थापन समितीचे मोरेश्वर डहलकर, शिक्षक पालक संघाच्या सदस्या मिनाक्षी फुलझेले,शिवराम नवघडे,समर्थ,सूनिल नवघडे, अशोक गंडाटे तसेच माजी विदयार्थी अमोल उंदिरवाडे, रूपाली सुरपाम, प्रिती बुटोलिया, शितल आखाडे, मेघा जराते उपस्थित होते.
तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून साविञीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
सर्वप्रथम आपले ध्येय निश्चित करा,ध्येयाने झपाटून जा,कठीण परिश्रम केल्यास यश निश्चित प्रात्प होते.गुरूजनांच्या मार्गदर्शनानेच पूढील यशाची वाटचाल सुकर होऊ शकते, असे मत आपल्या मनोगतातून माजी विदयार्थ्यानी व्यक्त केले.
शिक्षणातूनच माणूस घडतो. शिक्षणाला जिवनात अनन्य साधारण महत्व आहे. शिक्षणातून विविध कौशल्य व ज्ञान संपादन करून त्यांचा आपल्यासाठी उपयोग करीत असतानाच आपण आपल्या कुटूंबासाठी, गावासाठी, समाजासाठी व शाळेसाठी काही करता येते काय यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन माजी विद्यार्थी रुपाली सुरपाम, प्रीती बुटोलिया,चेतन झाडे,अभय ठाकूर,मेघा जराते, नेताजी ठाकूर, सचिन कावळे, विवेक राऊत, पंकज घोगरे, उंदिरवाडे, जराते यांनी मनोगतातून व्यक्त केले.
मेळावा आयोजना मागणी भूमिका प्राचार्य रविंद्र कूडकावार यांनी प्रास्ताविकातून मांडली. या कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी, पालक, माजी विदयार्थी मोठया संख्येनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सहा. शिक्षक प्रदिप दोडके यांनी तर आभार सहा.शिक्षक गोंविदा बुरांडे यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक तथा शिक्षकेत्त्र कर्मचारी  व विदयार्थी यांनी सहकार्य केले.