स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत तपासणी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ डिसेंबर २०१९

स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत तपासणी

  मनपातर्फे मनपातर्फे सर्वात स्वच्छ शासकीय कार्यालय, रहिवासी गृहनिर्माण संस्था, रुग्णालये, शाळा, बाजार समिती, हॉटेल घोषित
चंद्र्पुर २ नोव्हेंबर - स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत चंद्रपूर शहरातील शासकीय कार्यालये, रुग्णालये, शाळा, व्यावसायिक क्षेत्रे, हॉटेल्सची स्वच्छताविषयक तपासणी नुकतीच चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे करण्यात आली. ऑक्टोबर २०१९ ते डिसेंबर २०१९ या तिमाही कालावधीसाठी करण्यात आलेल्या या तपासणी अंतर्गत शहरातील 11 शासकीय कार्यालये, 41 रुग्णालये, 10 शाळा, 6 नामांकित हॉटेल्स तसेच रहिवासी गृहनिर्माण संस्थाची तपासणी करण्यात येऊन स्वच्छतेविषयक गुणवत्तेनुसार त्यांना क्रमांक देण्यात आले. यात शासकीय कार्यालयात जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालय , रुग्णालये विभागात संयुक्तरीत्या घाटे हॉस्पिटल व क्राइस्ट् हॉस्पिटल, हॉटेल्स विभागात एन डी हॉटेल, रहिवासी गृहनिर्माण संस्थामधे कोणार्क अपार्टमेन्ट् तर शाळांमध्ये सावित्रीबाई फ़ुले प्राथमिक शाळा प्रथम क्रमांक मिळाला आहे.

स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत प्रत्येक शहरातील शासकीय कार्यालय, संस्था, हॉटेल्सची स्वच्छताविषयक तपासणी प्रशासनाला करावयाची असून त्यांना निकषानुसार गुणानुक्रम द्यायचा आहे. स्वच्छ भारत अभियानाचा अधिकाधिक प्रसार होऊन नागरिकांचा त्यामध्ये सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने सदर पाहणी मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. त्यानुसार जुलै २०१९ ते सप्टेंबर २०१९ या तिमाही कालावधीत चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीतील विविध शासकीय कार्यालये,रहिवासी गृहनिर्माण संस्था, रुग्णालये, शाळा, बाजार समिती, हॉटेल्सची स्वच्छताविषयक तपासणी पालिकेच्या चमूद्वारे करण्यात आली. स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत शासनाने निर्धारीत केलेल्या निकषांनुसार जे कार्यालय, संस्था, हॉटेल्स स्वच्छतेच्या मापदंडावर खरे उतरले त्यांना पालिकेतर्फे सर्वात स्वच्छ घोषित करण्यात आले आहे. यात जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालयाला सर्वाधिक गुण मिळाले असून हे शहरातील सर्वात स्वच्छ शासकीय कार्यालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. याचप्रमाणे संयुक्तरीत्या घाटे हॉस्पिटल व क्राइस्ट् हॉस्पिटल, गोल बाजार मार्केट, एन डी हॉटेल, कोणार्क अपार्टमेन्ट् तर शाळांमध्ये सावित्रीबाई फ़ुले प्राथमिक शाळा यांना त्या त्या विभागात सर्वात स्वच्छ घोषित करण्यात आले आहे. 

अ.क्र
क्षेत्रे
तपासणी झालेल्याचे नाव
गुणानुक्रम
व्यावसायिक क्षेत्र
गोल बाजार मार्केट
गंज मार्केट
शासकिय कार्यालय
जिल्हा अधिक्षक कृषि कार्यालय
जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालय
रहिवाशी गृहनिर्माण
कोणार्क अपार्टमेन्ट्
साई रेसिडेन्सी
हॉटेल
द एन डी हॉटेल
ट्रायस्टार इन प्रा. ली.
शाळा
सावित्रीबाई फ़ुले प्राथमिक शाळा 
१०
पॅरामाऊन्ट कॉन्व्हेंट बाबुपेठ
११
रुग्णालय
घाटे हॉस्पिटल
१२
क्राइस्ट्  हॉस्पिटल
२  
१३