कंत्राटदाराचे निष्काळजीपणामुळे नागरिक जखमी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०४ डिसेंबर २०१९

कंत्राटदाराचे निष्काळजीपणामुळे नागरिक जखमीतालुका प्रतिनिधी/सिंदेवाही 
नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्र. ९ मध्ये शासकीय निधीतून सुरू असलेले नालीचे बांधकाम संतोष रघुनाथ कोंडेकर यांचे  घरासमोरून सुरू असून कंत्राटदाराचे कामावर असलेल्या मजूरांचे निष्काळजीपणामुळे जखमी चे जाने येन्याचे रस्त्यावरील लोखंडी सळाकी वाकविल्या नसल्याने जखमी कोंडेकर हे घरातील कचरा फेकण्यासाठी बाहेर निघाले असता, मातीवरून पाय घसरून पडल्याने उभ्या साखळीतील एक सळाक पोटात घुसल्याने जखमी झाले. त्यामुळे त्यांना सिंदेवाहीतील डॉ. चिंतावार यांचे दवाखान्यात भरती केले असून उपचार सुरू आहेत. जखमिचे पोटात लोखंडी सळाक घुसल्याने झालेल्या जखमेवर चार टाके लागले असून जखमी दवाखान्यातच उपचार घेत आहे. कंत्राटदार यांचेकडून जखमीला आर्थिक मदत मिळावी अशी परिसरातील जनतेची मागणी आहे.