कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ यांना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे निवेदन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१० डिसेंबर २०१९

कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ यांना अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे निवेदनयेवला प्रतिनिधी - विजय खैरनार

येवला शेतकऱ्यांना त्वरित सरसगट कर्जमाफी मिळावी म्हणून त्वरित योग्य निर्णय घ्यावा,विविध कार्यकारी संस्थेचे आर्थिक व्यवहार ठप्प झालेले सुरळीत करण्यासाठी नाशिक जिल्हा बँकेच्या अडचणीत मार्ग काढून सर्व खातेदारांना न्याय मिळवून  देण्यासाठी संबंधित विभागास शासन स्तरावरून योग्य ती कार्यवाही करावी,अतिवृष्टीमध्ये पिकांची झालेल्या नासाडी मुळे सर्व शेतकरी अडचणीत आले आहे, म्हणून जाहीर झालेली मदत त्वरित वितरण करण्याचे संबंधित कर्मचार्यांना आदेश द्यावे,तसेच सद्या शेतकऱ्यांना महावितरण कंपनीकडून शेतीसाठी अनियमित मिळणारा वीज पुरवठा,तालुक्यात ठिक-ठिकाणी विद्युत तारा ढिल्या झाल्याने दळन-वळनास अडथळा निर्माण करत आहेत त्या मुळे शेतकऱ्यांना चारा वाहतूक करणे जीवावर बेतत आहे,यामुळे सर्व शेतकरी हवालदिल झाले आहेत,म्हणुन महावितरण कंपनीचा चालू असलेला येवल्यातील मनमानी कारभार थांबवावा.तसेच अति वृष्टीमुळे तालुक्यातील सर्व रस्ते खराब झाले आहे तालुक्यातील सर्व खेडोपाडी वाडीवस्त्यावर नादुरुस्त असलेल्या रस्त्यांना संबंधित विभागास डागडुजी करण्यासाठी निर्देश देण्यात यावे.व अजूनही तालुक्यात बोकटे येथे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही रस्त्यांना डांबरीकरण नाही,डांबरीकरण असलेले रस्ते खराब झाले आहे, तिथे  डांबरीकरण व्हावे,पाटबंधारे विभागाच्या ४६ ते ५२ कॅनॉल सह सर्व पोट चाऱ्यांच्या रस्त्याना अतिवृष्टीमुळे मोठं मोठाले खड्डे झाल्याने ग्रामीण भागात  नागरिकांना विविध अडचणीला सामोरे जावे लागत आहे,वरील सर्व प्रकारच्या अडचणी फक्त आपणच सोडवु शकतात. म्हणून आमच्या मागण्यांचा अधिवेशनात विचार करावा व,मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात यावा असे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती चे तालुका अध्यक्ष हितेश दाभाडे,भगवान जाधव,सुंनदा आव्हाड,अशोक दाभाडे,मच्छिंद्र चव्हाण,सुरेश जऱ्हाड, कविता जऱ्हाड,अंकुश कानडे,मंगल कानडे,कविता जऱ्हाड, कन्हैयालाल कानडे,यांनी भुजबळांचे प्रतिनिधी बाळासाहेब लोखंडे व लोंढे नाना यांना कार्यालयात  विविध समस्यांचे निवेदन दिले.