वाडी नगर परिषद कार्यालयाची प्रतिमा मलीन करणाऱ्या संदेशाचा कर्मचाऱ्यांनी केला निषेध - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०९ डिसेंबर २०१९

वाडी नगर परिषद कार्यालयाची प्रतिमा मलीन करणाऱ्या संदेशाचा कर्मचाऱ्यांनी केला निषेध

नागपूर / अरूण कराळे 
भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३  व्या महापरिनिर्वाण दिन नागपूर तालुक्यातील  वाडी नगर परिषद प्रशासनातर्फे मानवंदनेचा कार्यक्रम संपूर्णपणे शासकीय पध्द्तीने करण्यात आला असतांना काही समाजकंटकांनी नगर परिषद कार्यालयाची प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूपरस्पर शहरात अधिकारी व कर्मचारी यांच्या विषयी वाईट भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने वॉटसअपच्या माध्यमातून मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी सदर कार्यक्रमात मानवंदनेच्या प्रसंगी जुते घालून श्रद्धांजली दिल्याचा खोटा संदेश वायरल केला आहे.

वस्तुस्थितीत मुळात असा कोणताही प्रकार नगर परिषद कार्यालयात घडलेला नसतांना अधिकारी वर्गाप्रती असलेल्या द्वेष भावनेतून खोट्या बातम्या शहरात पसरविल्या गेल्याने या घटनेचा उपमुख्याधिकारी आकाश सहारे  यांच्या प्रमुख उपस्थितीत लेखापाल चेतन तुरणकर,शैलेश आडीवाडेकर,विलास बोरकर,आकांक्षा पाटील,प्राची लांजेवार,सुरज बाळेकर, अभिजित हांडे,रोहित शेलारे, धर्मेंद्र गोतमारे,भारत ढोके,योगेश जहागिरदार,रमेश इखनकर,अशोक जाधव,रितेश गजभिये,कमलेश तिजारे,लक्ष्मण ढोरे,संदीप अढाऊ,भीमराव जासुतकर आदी कर्मचारी वर्गांनी  निषेध केला आहे .