दोन दिवसांपासून येणाऱ्या धुई ने शेतकरी हबकले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१८ डिसेंबर २०१९

दोन दिवसांपासून येणाऱ्या धुई ने शेतकरी हबकलेयेवला प्रतिनिधी/ विजय खैरनार

येवला: ता.१७; तालुक्यातील गारखेड़ा तसेच इतर भागात दोन दिवसांपासून बहुतेक भागात येणाऱ्या धुई (धुके) ने थंडगार हवेने शेतकरी हबकला असून पिके अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अगोदरच दोनदिवसआड येणारे ढगाळ वातावरनाणे शेतकरी बेजार असताना कालपासून पडणारे दाट धुकं पिकासाठी आणखी  चिंता वाढवणारे ठरणार आहे. धुई ने गहू,हरबरा उन्हाळ कांदे रोपे व भाजीपाला पिकांची पार वाट लागणार असल्याने शेतकरी हबकला आहे.
    परतीच्या पावसाने विहिरीत बऱ्यापैकी पाणी आले.पण पाणी देण्यासाठी विजेचा प्रश्न,कापूस वेचणीला मजूरांचा प्रश्न, होता, रात्रीच्या वेळी वीज देण्यात येत असल्याने अंधारात पिकांना पाणी द्यावे कसे याचा प्रश्न ,अशा अनेक अडचणीं,प्रश्न समोर असताना ही पाणी आहे म्हणून शेतकऱ्यांनी गहू, हरबरा या मुख्य पिकासोबत भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणावर केली, हिवाळ्याचे जवळपास तीन महिने होत आले तरी थंडीचा पत्ताच नसल्याने शेतकरी चिंतेत असतांना गेल्या दोन दिवसात तालुक्यातील बहुतेक भागात दाट धुके (धुई)येत आहे, या धुई ने सर्वच पिकांना फटका बसणार आहे,भाजीपाला पिकांना याचा मोठा फटका बसणार आहे. हिरवी मिरची,वांगे,कांदे ,टमाटे यावर तर याचा लगेच परिणाम जाणवणार आहे तर गहू ,हरबरा पिकांची अवस्था ही बिकट होणार आहे.अतिवृष्टी ने झालेल्या नुकसानीची शासन मदत अद्यापही पदरात पडली नसताना या धुई च्या नवीन अस्मानी संकटाची भर पडली असल्याचे येथील शेतकरी नानासाहेब आहेर यांनी सांगितले, तर उशिरा पेरणी झालेला गहू व हरबरा कांदे रोपे या पिकांना धुईचा थेट परिणाम दिसणार असल्याचे गारखेड़ा येथील शेतकरी नानासाहेब आहेर यांनी सांगितले.
   एकूण संकटांची ही मालिका संपण्याचं नावं घ्यायला तयार नाही.त्यामुळे शेतकरी चांगलाच हबकला आहे.