दिल्ली पब्लिक स्कूलमधे कर्णबधिर विद्यार्थ्यांचे अप्रतिम नृत्य - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०५ डिसेंबर २०१९

दिल्ली पब्लिक स्कूलमधे कर्णबधिर विद्यार्थ्यांचे अप्रतिम नृत्यनागपूर - कामठी रोडवरील दिल्ली पब्लिक स्कूलमधे शनिवारी (ता. 30) स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या स्नेहसंमेलनात शासकीय बहु. अपंग मुलांचे संमिश्र केंद्र व शासकीय अपंगांची कर्मशाळा सदर नागपूर या संस्थेतील कर्णबधिर (दिव्यांग) विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर नृत्य सादर केले.
कर्णबधिर विद्यार्थ्यांचे नृत्य आयोजनासाठी दिल्ली पब्लिक स्कूलचे नृत्य शिक्षक श्री माधव वैद्य, नृत्य शिक्षिका श्रीमती शालिनी वंगानी, अपंग कर्मशाळाचे विशेष शिक्षक श्री दिनेश गेटमे यांनी परिश्रम घेतले. या कर्णबधिर विद्यार्थ्यांचे पोलीस उपायुक्त (झोन क्रमांक 5) श्री निलोप्तल, दिल्ली पब्लिक स्कूलच्या प्राचार्य रितू शर्मा यांनी कौतुक केले. तर नृत्य शिक्षिका श्रीमती शालिनी वंगानी यांनी भेटवस्तू देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार केला. विद्यार्थ्यांच्या नृत्य आयोजनासाठी विशेष शिक्षक श्री दिनेश गेटमे, श्री दिलीप समुद्रे, श्री मडावी, श्री अवसरकर, श्री कोलते, अधिक्षक सौ पोहरकर, श्री मोंढे यांनी सहकार्य केले.