युवासेनेच्या नेत्यांनी शिवसेना प्रमुखांचा दिलेला शब्द पाळला:खा .कृपाल तुमाने - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२८ डिसेंबर २०१९

युवासेनेच्या नेत्यांनी शिवसेना प्रमुखांचा दिलेला शब्द पाळला:खा .कृपाल तुमाने

वाडीत युवासेनेचा स्तुत्य उपक्रम
वाडीत शासनाच्या अनुदानाशिवाय सुरू झाली
 शिवभोजनथाळी


नागपूर / अरुण कराळे 

विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान दिलेल्या वचननाम्यानुसार राज्यातील सामान्य गोरगरीब,कामगार,शेतमजूर,शेतकरी यांना १० रुपयात जेवण व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याच्या आश्वासनाची पूर्तता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होताच हिवाळी अधिवेशनात केल्याने येत्या नवीन वर्षात प्रायोगिक तत्त्वावर राज्यात ५० ठिकाणी शिव भोजन थाळी योजना सुरू करण्याचे तसेच शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंत कर्ज माफ केल्याने शिवसेना प्रमुखाने दिलेला शब्द पाळून वचननामा खरा करून दाखविल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण तयार झाल्याने रयतेचे राज्य आले असल्याचे मत यावेळी खासदार कृपाल तुमाने यांनी व्यक्त केले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या रयत माऊली अन्नसेवा अंतर्गत युवासेना जिल्हाप्रमुख हर्षल काकडे, शिवसेना हिंगणा विधानसभा संघटक संतोष केचे,सामाजिक कार्यकर्ते दिलीप शाह यांनी स्वयंस्फूर्तीने सामाजिक भावनेतून पुढाकार घेत शासन अनुदानाशिवाय वाडी - एमआयडीसी चौकातील राहुल कॉम्प्लेक्स परिसरात शिव भोजन थाळी योजनेनुसार १० रुपयात जिल्हयातील पहिल्या भोजन केंद्राचे उदघाटन खासदार कृपाल तुमाने यांच्या हस्ते करण्यात आले.पहिल्याच दिवशी ३४५ लाभार्थ्यांनी शिव भोजन थाळीचा आस्वाद घेत समाधान व्यक्त करून या स्तुत्य उपक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.


शासनाच्या मदतीची वाट न बघता युवासेनेने जनहितार्थ हा उपक्रम प्रारंभ केला असून शासनाची मदत प्राप्त झाल्यावर ही योजना उत्तम पद्धतीने यशस्वी करू असे प्रतिपादन युवासेना जिल्हा प्रमुख हर्षल काकडे यांनी प्रास्ताविकतेतून दिले . यावेळी वाडी नगर परिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक राजेश जयस्वाल,नगरसेविका मीरा परिहार,विजय मिश्रा ,शत्रुघ्नसिह परिहार,विलास भोंगाडे, प्रा .सुरेंद्र मोरे,कपिल भलमे,प्रफुल भलमे,अखिल पोहनकर, पंकज कौंडण्य ,सविता शाह,मोनिका राऊत,संदीप उमरेडकर,संतोष केशरवानी,सचिन बोबले,दीपक रहांगडाले,मोहित कोठे,पिंटू पोहनकर,रंजीत सोनसरे,संदीप विधळे, श्यामलाल सकलानी, शिवनारायण पवार,विठ्ठल राव,अखिलेशसिंग, क्रांतिसिंग,राजेश शेळके,लोकेश जगताप ,सुनील बनकोटि,निखिल डवरे,अविनाश राऊत,प्रमोद जाधव,शरणागत,रमेश सातपुते, पंढरीनाथ राऊत,आकाश इंगोले,सुनील बनकोटि, मोहन पाठक,मंगेश चोरपगार,महादेव सोनटक्के श्यामलाल सकलानी,संतोष गुप्ता,विजय रडके,पर्वत सिंग सोलंकी,गोपाल राठी,पुरुषोत्तम गोरे, पप्पू पटले,सुहास सिंगरू,प्रमोद जाधव,मोहन पाठक,महादेव सोनटक्के,अविनाश राऊत आदीं कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत खासदार कृपाल तुमाने यांनी १० रुपये भरून भोजनाचा स्वाद घेत स्तुत्य उपक्रमाबद्धल युवासेना जिल्हाप्रमुख हर्षल काकडे,संतोष केचे यांचे अभिनंदन केले.