थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त तारादूत मार्फत समाजप्रबोधन व समुपदेशन. - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२१ डिसेंबर २०१९

थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त तारादूत मार्फत समाजप्रबोधन व समुपदेशन.


चामोर्शी/प्रतिनिधी :
थोर समाजसुधारक वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त अनुदानित आश्रम शाळा अड्याळ या ठिकाणी छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण मानव विकास सारथी पुणे या शासनाच्या स्वायत्त संस्थे अंतर्गत तारादूत या पददर्शी प्रकल्पाअंतर्गत विद्यार्थ्यांचे व गावकऱ्यायांचे प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक के.बी.कोवासे,प्रकल्पाचे तारादूत जीनत  सय्येद मार्गदर्शक,व शाळेतील शिक्षक के.एम.टिकले,एस.के .गंडाते ,डी. आर.कांबळे, व्ही. एस.सुरजागडे यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात सुरुवातीला संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या वेळी संत गाडगेबाबा यांच्या जीवनचरित्रावर तसेच इतर थोर पुरुषांचे विचार ,स्वच्छतेचे महत्त्व,विस्तृतपणे विषद करून त्यावर प्रकाश टाकण्यात आला.

त्याचप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलन यावर समुपदेशन करण्यात आले.समाजात चालू असलेल्या अनिष्ठ-रूढी परंपरा ह्या कालबाह्य झालेल्या असल्यानं त्यांना फाटा देण्यात यावा जग आज विज्ञान युगात आहे त्यामुळे अश्या अनिष्ट प्रथा मुळे समाज  मागे जातो आहे.त्यामुळे संगणकाच्या या युगात अनिष्ट प्रथा  सोडनेच योग्य आहे असे मार्गदर्शन चामोर्शी तालुक्याच्या "तारादूत " कु.जीनत सैय्यद यांनी उपस्थितांना केले.यावेळी मान्यवरांचे समयोचित मार्गदर्शन झाले.

शासनाच्या सारथी संस्थेमार्फत अडयाळ येथे पहिल्यादांच समाज प्रबोधन, व समुपदेशन चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यामुळे करमऱ्यांनी कार्यक्रमचे कौतुक केले आहे.