क्रीडा क्षेत्रातील भोंगळ कारभारावर गोंडवाना विद्यापीठ चे उघडले डोळे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२० डिसेंबर २०१९

क्रीडा क्षेत्रातील भोंगळ कारभारावर गोंडवाना विद्यापीठ चे उघडले डोळे

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चा दणका 
देर आये पर दुरुस्त आये
चंद्रपुर/प्रतिनिधी:

काही दिवसा अगोदर गोंडवाना विद्यापीठ च्या निष्काळजी पणामुळे विद्यापीठ मधील (विद्यार्थिंनी) बॅटमिंटन खेळाडू टीम ला West National Zone या स्पर्धेला पात्र ठरूनही स्पर्धेला मुकावे लागले.या मुळे विद्यार्थिंनींचे नुकसान झाले.सम्बंधित विषय अभाविप कड़े येताच अभाविप व सीनेट मेंबर च्या वतीने या विषया चे गाम्भीर्य लक्षात घेत सदर विद्यापीठाला कारणे दाखवा ही मागणी केली.

या वर विद्यापीठ चे ढवळाढवळी चे उत्तर मिळत असल्यामुळे अभाविप ने प्रत्यक्ष गोंडवाना विद्यापीठ चे कुलगुरु श्री.कल्याणकर'ला भेट देऊन या विषया चे गाम्भीर्य सांगितले आणि या विषयाला जबाबदार व्यक्तींवर  लवकर कार्रवाई करावी अन्यथा अभाविप च्या आंदोलनाला पुढे जावे लागेल असे आव्हान केले.यामुळे विद्यापीठ ने धड़ा घेत परत असे न व्हावे या साठी हालचाल सुरु केली,पण परत दूसरी बॉस्केटबॉल (विद्यार्थिंनी) टीम ला पण याच विषयला पुढे जावे लागले आणि त्यांना ही स्पर्धेला मुकावे लागणार अशी वेळ आली होती पण,सीनेट मेंबर आणि आभाविप च्या प्रयत्नान मुळे हा विषय परत होता होता टळला याचा फायदा बास्केटबॉल टीम ला स्पर्धेला जायला मिळाले. 

पण अभाविप व सीनेट मेम्बरच्या दणक्याने गोंडवाना विद्यापीठ ने दिनांक १७-१२-२०१९ ला बैठक घेतली व या विषयाला जबाबदार व्यक्तींवर कारवाई करू असा निणर्य घेतला.

या विषयावर अभाविप चे लक्ष आहे, सम्बंधित अधिकारी लोकांवर कार्रवाई झाली पाहिजे ही मागणी अभाविप घेऊन आहे असे न घडल्यास आंदोलना चा इशारा अभविप ने विद्यापीठ ला दिला आहे.