सावित्रीच्या लेकीवर बस वाहकाने उगारला हात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१६ डिसेंबर २०१९

सावित्रीच्या लेकीवर बस वाहकाने उगारला हात

                     
 चंद्रपूर/प्रतिनिधी:
 देश  बलात्काराच्या  घटनेने हादरुन गेला असताना व महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चा होत असतांना चंद्रपुरात एका महाविद्यालयीन विद्यार्थिनींवर बस वाहकाने हात उगारण्याची घटना  समोर आली आहे.

        १५/१२/२०१९ रोजी चंद्रपुर जूनोना मार्गे पोंभूर्णा जाणाऱ्या बस मध्ये लोकमान्य टिळक विद्यालयात १२ व्या इयतेत्त शिकणाऱ्या मुलीं एक्स्ट्रा क्लास संपवुन जुनोंन्याला परत येत असताना रविवार दिवस आहे म्हणून पास चालणार नाही म्हणून कु. पूजा शामराव नागोसे नावाच्या मुलीला मारहाण करुण तिच्या सोबत असलेल्या  दीक्षा पुंडलिक मामिडवार हिला आंबेडकर चौकाच्या अलिकडेच बस उतरवून दिले.

त्याचा निषेध म्हणून गावकरी  बल्लारशाह पोलिस स्टेशनला तक्रार घ्यायला गेले असता नकार देऊन परत पाठवलं  ह्या प्रकारचा निषेध म्हणुन गावकऱ्यांनी आज सकाळी  बस रोखुन धरली आणि आगार प्रमुख चंद्रपुर ह्यांच्याशी बोलन्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद  मिळाला नाही.

 उलट पोलीस अधिकाऱ्यांना बोलाउन गावकर्यांना दबाव आणण्याचा प्रयत्न केला .सदर गाड़ी क्रमांक MH40N8958 असा आहे आणि बस वाहक नाव बबिता  असे आहे.संतप्त गावकऱ्यांची वाहकावर योग्य कार्यवाही अशी मागणी जोर धरत आहे.