पाण्याची लाईन फुटल्याने तळे साचले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०७ डिसेंबर २०१९

पाण्याची लाईन फुटल्याने तळे साचलेनागपूर/ प्रतिनिधी
बेसा रोड स्तिथ वसुंधरा सोसायटी मधील पाण्याची मेन लाईन सतत फुटल्यामुळे आज महाराष्ट्र प्रदेश पंचायत परिषद व वसुंधरा सोसायटी मधील स्थानिक रहिवासी यांनी मिळून सोसायटीमधील रिकाम्या जागी पाणी साचत असल्यामुळे तेच पाणी सोसायटी मधील प्रमुख रस्त्यावर येते आणि येण्या - जाण्यास प्रचंड त्रास होत आहे.
 साचल्यापाण्या मधून होणारे डासांपासून स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत , ही प्रमुख पाइपलाइन असून सर्वत्र याच पाइपलाइन मधून पाणी पुरवठा होतो, या आधी सुद्धा ही पाइपलाइन तीनदा दुरुस्त करण्यात आली आहे या सर्व बाबींकडे  लक्षकेंद्रीत करून आज महाराष्ट्र प्रदेश पंचायत परिषद तशेच वसुंधरा सोसायटी मधील स्थानिक रहिवासी यांनी मिळून आज साचल्या पाण्यात नाव(boat) सोडून सर्वांचे वेधले . जर येणाऱ्या दिवसात या गोष्टींची दखल लोकप्रतिनिधीं किवा सबंधित आधिकरी यांनी घेतली नाही तर हेच पाणी त्यांना पाजण्यात येईल., असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.