दोन वेगवेगळया कार्यवाहीत १३६००० रुपयांचा दारू साठा जप्त # - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१९ डिसेंबर २०१९

दोन वेगवेगळया कार्यवाहीत १३६००० रुपयांचा दारू साठा जप्त #
सिंदेवाही पोलिसांची कार्यवाही
       
सिंदेवाही- सिंदेवाही पोलिसांना मुखबीरद्वारे मिळालेल्या माहितीवरून (मोहाळी) जामसाळा मौजा बस स्टॉप गावाजवळील माता मंदिर जवळ नाकेबंदी केली असता या नाकेबंदी दरम्यान वासेरा गावाकडून येत असलेल्या बिना नंबर प्लेट मोटर सायकलला थांबवुन चौकशी केली असता त्या मोटर सायकलवर मागच्या सिट वर बसलेल्या इसमाच्या हातात पंढ-या रंगाच्या चूंगळीमध्ये ४ कॅन मोहा दारू १० ली. प्रमाणे ४ कँन मधील अशी एकुण चाळीस लिटर दारू दिसून आली व सोबत दुचाकी वाहन एकूण किंमत ६८ हजार रुपये आहे. 
आकाश चंदू राखडे- वय 26 रा.शिवणी ता. सिंदेवाही, मच्छिंद्र हरिदास अलोणे वय - 26 रा. शिवणी ता. सिंदेवाही असे आरोपींचे नाव असुन दोन्ही आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे.
तसेच त्याच ठिकाणी त्याच नाकेबंदी दरम्यान समोरून येत असलेली MH-34 3651 या नंबरचे दुचाकी वाहन थाबंवुन चौकशी केली असता चार प्लास्टिक डपक्या  मोहा- दारू व दुचाकी वाहन असा एकूण - ६८ हजार रुपये आहे.
कैलास घरत  रा.शिवणी ता. सिंदेवाही, किसन गोमाजी घरत वय -५९ रा.शिवणी ता. सिंदेवाही असे असे आरोपींचे नाव असुन दोन्ही आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे.
या दोन्ही कार्यवाहीतील चारही आरोपींवर कलम ६५ (ई)  म.दा.का, ६५ (अ) ८३ म.दा.का नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सिंदेवाही पोलीस स्टेशन ठाणेदार निशिकांत रामटेके साहेब यांच्या मार्गदर्शनात पीएसआय  नेरकर, दामोधर परचाके, ईश्वर लेनगुरे, ज्ञानेश्वर डोकळे, गणेश मेश्राम, मंगेश मातेरे यांनी केली आहे.