डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे परळचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ डिसेंबर २०१९

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे परळचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे परळचे निवासस्थान
राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेमुंबई, दि. 6 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परळ दामोदर हॉलजवळील बीआयटी चाळ येथील इमारतीत दुसऱ्या माळ्यावर राहायचे. 1912 ते 1934 या 22 वर्षे कालावधीत त्यांचे येथे वास्तव्य होते. हे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमी दादर येथे केली.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री जयंत पाटील, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, खासदार राहूल शेवाळे, आमदार जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त प्रविण परदेशी आदि उपस्थित होते.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनी
 राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री यांचे अभिवादनमुंबई दि 6 : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी राज्यपाल म्हणाले, आपण सर्व मिळून बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत बनवण्याचा प्रयत्न करुया. बाबासाहेबांचे विचार अनेक पिढ्यांना प्रेरणादायी आहेत. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून देश एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण देश त्यांना आज अभिवादन करीत आहे. मी ही त्यांना विनम्र अभिवादन करित आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, बाबासाहेबांचे जीवन हे धगधगते अग्निकुंड होते. सामान्य माणसांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा उभारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परळ दामोदर हॉलजवळील, बीआयटी चाळ येथे 22 वर्षे वास्तव्य होते. ते निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री जयंत पाटील, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, आमदार आदित्य ठाकरे, मुबंईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी आदि उपस्थित होते. राज्यपाल श्री. कोश्यारी, विधानसभा अध्यक्ष श्री. पटोले, मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते श्रीमती कमला मेहता अंधशाळा दादर येथील अंध विद्यार्थ्यांना भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच डॉ. आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित केलेल्या छायाचित्र प्रदर्शनाला त्यांनी भेट दिली.

डॉ. आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या
परळच्या खोलीस पटोले, ठाकरे यांची भेट    


मुंबई, दि. : 6 डॉ. बाबासाहेब आंबेडकर परळच्या 'बीआयटी' चाळीतील दुसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक 50, 51 मध्ये राहत असत. याठिकाणी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. विधानसभा अध्यक्ष श्री पटोले, मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याठिकाणी बुद्धवंदना घेण्यात आली. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या खोल्यांमध्ये जाऊन तेथे जतन करण्यात आलेल्या वस्तू तसेच छायाचित्रांचीही माहिती घेतली. डॉ. बाबासाहेबांच्या वास्तव्यामुळे ही वास्तू एक महत्त्वाचे वारसास्थळ ठरली आहे.त्यामुळे ही वास्तू राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन करण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले.यावेळी मंत्री सुभाष देसाई, जयंत पाटील, आ. जितेंद्र आव्हाड, आ. आदित्य ठाकरे, मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.


महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विधानभवनात आदरांजलीमुंबई, दि. 6 : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज विधानभवन येथील त्यांच्या प्रतिमेस विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विधानपरिषदेच्या उपाध्यक्षा डॉ.निलम गोऱ्हे, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, ‍विधानसभा सदस्य मंगल प्रभात लोढा, राहूल नार्वेकर, माजी सदस्य तुकाराम बिडकर, राज पुरोहित, विधिमंडळाचे सचिव (कार्यभार) राजेंद्र भगत, उपसचिव विलास आठवले, सभापतींचे सचिव महेंद्र काज, अवर सचिव सायली कांबळी आदींसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.