चंद्रपूर:तीन वाहनांच्या विचित्र अपघातात ४ जीव ठार - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२३ डिसेंबर २०१९

चंद्रपूर:तीन वाहनांच्या विचित्र अपघातात ४ जीव ठार

मूल/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर मुल मार्गावरील जानाळा गावाजवळ झालेल्या विचीत्र अपघातात दोन ठार तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.

 या अपघातात दुचाकी स्वार दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला तर दोन म्हशीचा देखील या अपघातात मृत्यू झाला.तर बसमधील काही प्रवासी व बोलेरो गाडीतील प्रवासी हे जखमी आहेत.जखमीना उपचार करण्याकरीता जिल्हा रूग्णालयात चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात भद्रावती वरून मुल येथील मार्कंडा येथे अस्थी विसर्जनासाठी एक कुटुंब स्कूल बस मधून जात होते तर बोलेरो पिकप वाहन हे म्हशी घेऊन चंद्रपूर येथे जात होते.

व मागून दुचाकी वर स्वार असलेल्या दोघांनी ओव्हरटेक करतात बोलेरो गाडीला धडक दिली. या ओव्हरटेक करण्याच्या नादात तिहेरी अपघात याठिकाणी घडला मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीवरून मोह फुलांनी भरलेली थैली नेण्यात असल्याची माहिती आहे व अशातच वनविभागाचे काही कर्मचारी या वाहनाचा पाठलाग करत असताना हा अपघात घडला असल्याची चर्चा घटनास्थळी बघायला मिळाली.
या घटनेबाबत मुल पोलीस स्टेशन येथे मर्ग दाखल केला असून पोलीस तपास सुरू आहे.