आ.किशोर जोरगेवार यांचा महिनाभरातील कामांचा लेखाजोखा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२३ डिसेंबर २०१९

आ.किशोर जोरगेवार यांचा महिनाभरातील कामांचा लेखाजोखा

चंद्रपूर/

1. जिल्हातील नागरिकांना घरगुती वापरातील २०० युनिट विज मोफत देण्यात यावी, शेतक-यांना वीज मोफत देण्यात यावी, उदयोगवाढीसाठी उदयोगांना सवलतीच्या दरात विज देण्यात यावी,

2. राज्यातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचा-यांना जूनी पेंशन योजना लागू करण्यात यावी,

3. कर्नाटक एम्टा खानीतील अवैध कोळसा उत्खनन प्रकरणाची चौकशी करण्यात यावी

4. ताडोबा अभ्ययारण्यातील भ्रमंती चंद्र्रपूरकरांसाठी निशुल्क करण्यात यावी

5. चंद्रपूर येथील दिक्षा भूमिच्या विकासाठी १०० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करावा

मुख्यमंत्री जिल्हा आढावा बैठकीतील विषय, 
चंद्रपूर विधानसभा क्षेत्राला काय मिळाले

1, बाबूपेठ उड्डाणपूलाच्या बांधकामासाठी तात्काळ १५ कोटी रुपये मंजूर

2 आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणी नंतर ५०० कोटी रुपयांच्या धानोरा बॅरेजच्या कामाचा आराखडा जून महिण्यापर्यंत सादर करण्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निर्देश

3. चंद्रपुरची आराध्य दैवत माता महाकाली मंदिराच्या सौदर्यीकरणाकरिता ५९ कोटींच्या कामावरील स्थगीती हटवली, अतिरिक्त २५ कोटी रुपयांच्या वाढिव निधीची मागणी.

4. प्रतंप्रधान आवास योजनेतील जाचक अटिपैकी एक असलेली पट्टयाच्या अटीमूळे नागरिकांना योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. याकडे मूख्यमंत्री यांचे लक्ष वेधले.

5.आमदार जोरगेवार यांच्या मागणी नंतर चंद्रपूरातील नागरिकांना घरपट्टे कसे देता येईल याकरिता मूख्यमंत्री यांनी महसूल विभागाला अहवाल तयार करण्याचे निर्देष

6. आरोग्य, प्रदुषनाच्या विषयांकडे लक्ष वेधले.

आमदार किशोर जोरगेवार यांच्या 
एक महिन्यातील महत्वाची कामे

1 विद्यार्थांच्या भविष्याशी खेळणारी महापरीक्षा पोर्टल बंद करण्यात यावे या करिता मूख्यमंत्री यांना निवेदन

2. आरोग्य विभागाची सेवा उत्तम करण्याच्या दिशेने शासकीय वैदयकीय महाविदयालय तथा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिका-यांशी बैठक,

3. जटपूरा गेटवरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी जिल्हाधिका-यांशी बैठक, पर्यायी मार्गावर चर्चा

4. कामागार क्षेत्र असलेल्या चंद्रपूर जिल्हातील कामागारांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच स्थानीकांना रोजगार मिळावा यासाठी सिएसटीपीएसच्या अधिका-यांशी बैठक

5.शहरातील विकासकामांचा आढावा तसेच पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मनपा आयूक्त व मनपा आधिका-यांशी बैठक,

6.तिन महिण्यांपासून मासेमारीकरीता बंद असलेले इरई धरण मासेमारीकरीता सुरु केले.