23 डिसेंबरला भव्य रक्तदान शिबीर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२२ डिसेंबर २०१९

23 डिसेंबरला भव्य रक्तदान शिबीर

उपजिल्हा रूग्णालयामार्फत राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय सिकलसेल मार्गदर्शन सप्ताहाला उत्तम प्रतिसाद
मूल/ प्रतिनिधी 
राष्ट्रीय सिकलसेल मार्गदर्शन सप्ताह निमीत्याने उपजिल्हा रूग्णालयाचे वतीने 23 डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. रूग्णालयात आयोजीत रक्तदान षिबीरात सहभागी होणा-या रक्तदात्याची काळजी घेण्यासाठी उपजिल्हा रूग्णालयाची संपुर्ण चमु तत्पर राहणार असल्याने रक्तदान षिबीराचा नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन  उपजिल्हा रूग्णालयाचे वैदयकिय अधिक्षक डॉ. बाबर यांनी केले.

उपजिल्हा रूग्णालय,तालुका वैदयकीय अधिकारी कार्यालय,सर्वादय युवा विकास संस्था चिमुर यांनी संयुक्तपणे राबविलेल्या राश्ट्रीय सिकलसेल मार्गदर्षन सप्ताहाला नागरीकांनी उत्तम प्रतिसाद दिला. मूल तालुक्यातील बेंबाळ,राजोली,मारोडा आणि चिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरवर घेण्यात आलेल्या सिकलसेल तपासणी आणि उपचार षिबीराला परिसरातील नागरीकांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला. 
     दरवर्शी 11 ते 17 डिसेंबर हा संपुर्ण देषात सिकलसेल मार्गदर्षन सप्ताह म्हणुन राबविला जातो. मूल तालुक्यात राबविण्यात आलेल्या सिकलसेल सप्ताहा निमीत्ताने तालुक्यातील ग्रामीण भागातील षाळा,महाविदयालय,आश्रम षाळेतील विदयार्थ्यांना, गावातील नागरीकांना सिकलसेल आजाराबाबत मार्गदर्षन करण्यात आले. सिकलसेल बाबत जनजागृतीसाठी महाविदयालयील विदयार्थी-विदयार्थीनींचे कलापथक तयार करण्यात येवुन विदयार्थ्यांच्या कलापथकाने पथनाटयव्दारे गावागावात जावुन ग्रामिणांना मार्गदर्षन केले. सप्ताहाचे औचित्य साधुन जुनासुर्ला येथील जिल्हा परिशद प्राथमिक षाळेच्या विदयार्थ्यांनी सिकलसेल आजाराविशयी गावातुन जनजागृती फेरी व रथयात्रा काढली.  राश्ट्रीय सिकलसेल सप्ताहाच्या यषस्वीतेसाठी उपजिल्हा रूग्णालयाचे वैदयकिय अधिक्षक डॉ. सुर्यकांत बाबर,तालुका वैदयकिय अधिकारी डॉ. खोब्रागडे,प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैदयकिय अधिकारी यांच्या मार्गदर्षनात सिकलसेल तालुका पर्यवेषक अषोक गीरडकर आणि स्वयंसेवकांनी सहकार्य केले.