चंद्रपूरमध्ये होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी तयारीचे निर्देश - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२८ नोव्हेंबर २०१९

चंद्रपूरमध्ये होणाऱ्या विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी तयारीचे निर्देशचंद्रपूर दि. 28 नोव्हेंबर : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागामार्फत चंद्रपूर येथील पोलीस मैदानावर नागपूर विभागीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली असून यासाठी आज सर्व संबंधित विभागाच्या प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी घेतली. सर्व विभाग प्रमुख यांनी आपल्या जबाबदाऱ्या पार पडाव्यात, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

विभागीय स्पर्धेला 1 ते 4 डिसेंबर दरम्यान सुरुवात होणार आहे. स्पर्धेमध्ये खोखो, हॉलीबॉल, हँडबॉल, तसेच लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, भालाफेक, थाळीफेक, धावणे व चालणे आधी खेळांच्या स्पर्धा पार पडणार आहेत. याशिवाय दररोज सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल देखील या वेळी राहणार आहेत. नागपूर विभागातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील 2300 आदिवासी खेळाडू आपल्यातील क्रीडा कौशल्याला सिद्ध करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

जिल्‍हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी केशव बावनकर, यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते. मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणावरून खेळाडू येणार असून त्यांची राहण्याची, खानपान व्यवस्था, याबाबत यावेळी चर्चा झाली.