भावना दुखावणार नाही याची खबरदारी घ्या - शिवसेना पक्षप्रमुख - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०९ नोव्हेंबर २०१९

भावना दुखावणार नाही याची खबरदारी घ्या - शिवसेना पक्षप्रमुखमुंबई/ प्रतिनिधी 
"मी तमाम जनतेला, सर्व पक्षांना, सर्व धर्माच्या, जातीच्या जनतेला आणि शिवसैनिकांना सुद्धा आवाहन करतो की आनंद जरूर व्यक्त करा पण आनंद व्यक्त करताना कोणाची भावना दुखावणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन  शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांनी केले.

ते म्हणाले, "हा जो काही विषय आहे हा नुसता विषय नाही आहे, हा एक मोठा लढा होता, मोठा आंदोलन होता. त्या आंदोलनात सहभागी झालेले काही लोकं आजही आपल्यासोबत आहेत, त्यांना सुद्धा मी मानाचा मुजरा करतो. काही लोकं त्या आंदोलनात शहीद झाले असतील त्यांनासुद्धा मी मानाचा मुजरा करतो." 

"प्रभू रामचंद्र यांचा नेमका जन्म कुठे झाला होता यांच्या वरून वाद सुरू होता आणि मला नक्कीच आनंद आहे की तो वाद आज संपलेला आहे. सर्व समाजाने हिंदू, मुसलमान,इतर सुद्धा सर्व धर्म आहेत, त्या सर्वांना मी धन्यवाद देतो कारण न्यायदेवतेने दिलेला हा निकाल, हा न्याय सर्वांनी स्वीकारलेला आहे."
"गेल्या अनेक वर्षांपासून जो एक वाद सुरू होता, त्या वादावर आज पडदा पडलेला आहे आणि मी सर्वप्रथम न्यायदेवतेला अक्षरशः साष्टांग दंडवत घालत आहे." अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे भावना व्यक्त केली. 

"संपूर्ण जगातील हिंदूंना आज शिवसेनाप्रमुखांची आठवण येणे स्वाभाविक आहे, ज्यावेळी मी हिंदू आहे हे बोलायला लोकं घाबरत होते तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी प्रत्येकाच्या मनात हिंदुत्वाचा अंगार फुलवला होता, गर्व से कहो हम हिंदू है ही घोषणा बुलंद केली, असेही पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे म्हणाले. 
"गेल्या अनेक वर्षांपासून जो एक वाद सुरू होता, त्या वादावर आज पडदा पडलेला आहे आणि मी सर्वप्रथम न्यायदेवतेला अक्षरशः साष्टांग दंडवत घालत आहे." असे शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे म्हणाले. 

"गेल्या अनेक वर्षांपासून जो एक वाद सुरू होता, त्या वादावर आज पडदा पडलेला आहे आणि मी सर्वप्रथम न्यायदेवतेला अक्षरशः साष्टांग दंडवत घालत आहे."
- शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे