मायणी तलाव वनराईत चंदन चोरीला उधाण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२० नोव्हेंबर २०१९

मायणी तलाव वनराईत चंदन चोरीला उधाण
मुख्य गेट पासून शंभर मीटरअंतरावरील चंदनाच्या झाडावर कुऱ्हाड : सुरक्षा रामभरोसे 


मायणी :-ता. खटाव जि. सातारा
येथील मायणी ब्रिटिशकालीन तलावाच्या सभोतली असणाऱ्या वनराईतील रक्तचंदनाच्या झाडाची बेधडक पणे तोड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून वनराईत प्रवेश करून तलावाकडे जाण्यासाठी मल्हारपेठ - पंढरपूर रस्त्यालगत असणाऱ्या मुख्य गेट पासून अवघ्या १०० मीटर अंतरावरील ही चंदनाची झाडे तोडण्यात आल्याने सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

         यंदा तलावात पाणी आल्याने सर्वत्र हिरवळ पसरली आहे,यामुळे तलावातील सभोवताली असणाऱ्या वनविभागाच्या हद्दीतील क्षेत्रात असंख्य प्रकारची गर्द झाडी पहावयास मिळत आहे. यामध्ये रक्तचंदनाच्या झाडांचाही समावेश आहे . 

         गेल्या काही वर्षापासून थंडावलेल्या रक्तचंदन झाडांच्या चोऱ्यानी पुन्हा एकदा डोके वर काढले का काय ? ही भीती वर्तवली जात आहे. तलावास व वनराईस नसलेली सुरक्षा यास जबाबदार आहे का? कोणाच्या आशीर्वादाने निर्धास्त चंदन चोरीचे धाडस चोरटे करीत आहेत .याची चौकशी होणे आवश्यक आहे.
         हिरवळ पानाफुलांनी बहरनाऱ्या चंदनाच्या झाडाची कुठे कत्तल तर कोठे झाडांवर अर्धवट कुऱ्हाड चालवल्याने ही झाडे सुकून जाऊ लागली आहेत. यास जबाबदार कोण ? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.