गड्डमवार थेट शेतीच्या बांधावर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०४ नोव्हेंबर २०१९

गड्डमवार थेट शेतीच्या बांधावर
सावली/प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान पाहण्याकरिता संदीपभाऊ गड्डमवार थेट शेतीच्या बांधावर गेले. योग्य ती नुकसान भरपाई देण्याकरिता राज्याचे मुख्यमंत्री मान नाम  देवेंद्रजी फडणवीस व पालकमंत्री मान नाम सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याशी दूरध्वनी वर संवाद साधला.
 मागील दोन दिवसांपासून परतीचा पाऊस व वादळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असून शेतातील संपूर्ण पीक खाली पळलेले याची प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संदीपभाऊ गड्डमवार यांनी पाहणी केले व त्यानंतर तहसीलदार यांची भेट घेऊन झालेल्या शेतकऱ्याच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित सादर करण्याची विनंती केली व याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याशी शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळण्याकरिता दूरध्वनी वरून संवाद साधला.
 यावेळी सतीश बोम्मावार, गुणवंत सुरमवार, प्रकाश खजांची, अनिल स्वामी, मोतीराम चिमुरकर,  सरपंच बंडू मेश्राम, प्रकाश लोंनबले, राकेश विरमलवार, दयाकर मुप्पावार, विक्की येणगांतीवर, प्रफुल्ल येनूरवार उपस्थित होते.