MBA आणि फाईन आर्टचे उच्चशिक्षित प्रेमीयुगुल निघाले अट्टल चोर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०४ नोव्हेंबर २०१९

MBA आणि फाईन आर्टचे उच्चशिक्षित प्रेमीयुगुल निघाले अट्टल चोर

युट्यूबवरुन घरफोडीचं प्रशिक्षण, उच्चशिक्षित प्रेमीयुगुल गजाआड
लिव्हइन मध्ये राहून आलेशान कारचा वापर करून करत होते चोरी

नागपूर/ललीत लांजेवार: 

घरफोड्या करीत असल्याचा संशय येऊ नये यासाठी चक्क आलेशान कारमधून फिरून घरफोड्या करणाऱ्या प्रेमीयुगुलाला नागपूर पोलिसांना अटक करण्यात यश मिळाले आहे. 

मुख्य म्हणजे हे प्रेमीयुगुल उच्चशिक्षित आहे.शैलेश वय २९,आणि प्रिया (वय २१)ही त्यांची नावे आहेत. शैलेशचे एमबीएपर्यंतचे शिक्षण झाले एका कंपनीत चांगल्या पदावर नौकरी करत होता मात्र झटपट श्रीमंत होण्याची इच्छा होती. त्यामुळे त्याने ही नोकरी सोडून गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारला.

शैलेशने युट्यूबवरून आवाज न करता चोऱ्या व घरफोड्या कशा कराव्या याचे प्रशिक्षण घेतले.व लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियालाही या कामात सहभागी करून घेतले.दोघेही लीवइनमध्ये राहत होते,या दोघांनाही आलिशान जीवन जगण्याची इच्छा होती. त्यासाठी त्यांना पैसा हवा होता. अखेर चोऱ्या करून हा पैसा उभा करण्याचे त्यांनी ठरविले. 

दोघे उच्च शिक्षित असल्याने,दोघांकडे एक कार असलयाने त्यांच्या घर मालकालाही कधीच त्यांच्यावर संशय आला नाही. व हे घरात मालक नसतांना आपल्या आलेशान करणे ने जात लाखो रुपयाचा माल सहजरीत्या उडवत होते,

शैलेश आणि प्रिया कारमध्ये बसून पश्‍चिम नागपुरातील विविध वस्त्यांमध्ये घरफोड्या करत होते.परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. पोलिसांनी मोठ्या शिताफीने चोरांना पकडले खरे, परंतु या चोरांना पाहून पोलीस चक्रावून गेले. कारण परिसरात लागोपाठ सात घरफोड्या करुन लाखोंचा मुद्देमाल पळवणारे चोर याच परिसरात एका आलिशान बंगल्यात राहणारे उच्चशिक्षित जोडपं निघाले.

चोरी आणि घरफोडीचे युट्यूब वर प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याचे प्रॅक्टिकल करण्यासाठी पहिल्यांदा त्यांनी स्वतःच्याच घरी चोरी केली. चोरीचा पहिला प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांनी शहरातील विविध परिसरात घरफोडी करायला सुरुवात केली. एकानंतर घरफोडी यशस्वी होत असल्यामुळे आणि त्यात मोठा मुद्देमाल त्यांच्या हाती लागत असल्यामुळे त्यांचा आत्मविश्‍वास वाढत गेला.

प्रत्येक चोरीच्या ठिकाणी एक भगव्या रंगाची कार दिसत असल्याचे तपासात समोर आले. परंतु ती कार एका बंगल्॒यासमोर उभी राहत असल्याने पोलिसांनाही त्यांच्यावर संशय येत नव्हता.अखेर तपासची चक्रे वेगाने फिरविण्यात आली व हे लिवईन मधील लवरच चोर निघाले.

मानकापूर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वजीर शेख ज्ञानेश्वर शेंडे, संतोष राठोड, राजेश वरठी, हितेश फरकुडे, सुनील विश्वाकर्मा, नगमा, वैशाली, ज्योती, अनिल मिश्रा व अजमत शेख यांनी ही कारवाई केली आहे. 

आतापर्यंत दोघांनी सात ठिकाणी घरफोड्या करून लाखोंचा मुद्देमाल चोरल्याची कबुली दिल ली दिली आहे. एमबीए आणि बीए फाईन आटैससारखे शिक्षण घेतल्यानंतर आणि चांगल्या नोकऱ्या

असतानाही झटपट श्रीमंत होण्यासाठी या तरुणांनी शोधलेला हा शॉर्टकट धक्कादायक आहे.