मायणी येथील प्रसिद्ध कापड व्यापारी रामचंद्र तारळेकर (आप्पा) यांचे निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२५ नोव्हेंबर २०१९

मायणी येथील प्रसिद्ध कापड व्यापारी रामचंद्र तारळेकर (आप्पा) यांचे निधनमायणी, ता.खटाव जि. सातारा (सतीश डोंगरे)

कै. रामचंद बनाप्पा तळेकर मायणी तालुका खटाव येथील जुन्या पिढीतील प्रसिद्ध कापड व्यापारी रामचंद्र बनाप्पा तारळेकर यांचे मुंबई येथे गुरुवार दिनांक 21 11 2019 रोजी दुपारी  बारा वाजून पंचवीस मिनिटाच्या दरम्यान वयाच्या 85 व्या  वर्षी निधन झाले ते मुंबई नेरूळ येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ  डॉक्टर संजय तारळेकर यांचे वडील आहेत तर पत्रकार पांडुरंग तळेकर यांचे चुलते आहेत त्यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी बहुसंख्येने आप्तेष्ट व मान्यवर उपस्थित होते कै.  रामचंद्र तारळेकर यांना आप्पा म्हणून सर्वजण  ओळखत होते आप्पा स्वभावाने अत्यंत स्वाभिमानी व मनमिळावू होते त्यांनी आपला मुलगा डॉक्टर संजय तारळेकर व दत्तात्रय तारळेकर त्यांच्यावर चांगले संस्कार केले त्यामुळे डॉक्टर संजय तारळेकर नेरूळ मुंबई परिसरात एक नामांकित हृदयरोगतज्ज्ञ म्हणून नावारूपास आले त्यांच्या सूनबाई डॉक्टर अनिता संजय तारळेकर याही हृदयरोगतज्ञ  आहेत त्यांनी मायणी व चितळी येथे कापड व्यवसाय केला त्यांचा मित्रपरिवार म्हणून खूप मोठा आहे त्यांच्या जाण्याने मायणी परिसरातून तसेच नेरुळ मुंबई परिसरातून  हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या मागे पत्नी दोन मुले दोन मुली सुना नातवंडे दोन जावई असा परिवार आहे.