राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत श्रीपाद काळे यांना रौप्य पदक - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१७ नोव्हेंबर २०१९

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत श्रीपाद काळे यांना रौप्य पदक


नागपूर, दि. 17 नोव्हेंबर 2019:-
सिकंदराबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या सहाव्या राष्ट्रीय मास्टर्स एक्वॉटिक चॅम्पियनशिप स्पर्धेच्या 100 मीटर बॅकस्ट्रोक या जलतरण क्रिडा प्रकारात श्रीपाद काळे यांनी व्दितीय स्थान प्राप्त करीत रोप्य पदक पटकाविले.

श्रीपाद काळे यांनी यापुर्वीही अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील जलतरण स्पर्धेत सहभागी होत विजेतेपद पटकाविले असून महावितरणच्या उमरेड शहर (2) शाखा कार्यालयात ते सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहेत, त्यांच्या या यशाबद्दल महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक तथा नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, नागपूर ग्रामिण मंडलचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, नागपूर ग्रामिण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री प्रफ़ुल्ल लांडे आणि त्यांच्या सहका-यांनी श्रीपाद काळे यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.