मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बघितला महा मेट्रोचा स्टॉल - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१५ नोव्हेंबर २०१९

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बघितला महा मेट्रोचा स्टॉल
• मेट्रो नियो ठरले युएमआय परिषदेत सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र

 
 नागपूर १५ :यंदाचा १२ व्या ‘अर्बन मोबिलिटी इंडिया परिषद आणि महा मेट्रो प्रदर्शनीचे उद्घाटन लखनऊ येथे उत्तर प्रदेशचे मा. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि मा. केंद्रीय राज्यमंत्री, श्री. हरदीप सिंह पुरी, आवास आणि शहरी कार्य तथा नगर विमानन मंत्रालय स्वतंत्र प्रभार) वाणिज्य एवं उद्योग मंत्रालय,भारत सरकार आणि श्री. दुर्गा शंकर मिश्रा सचिव (शहरी विकास) मंत्रालय यांच्या हस्ते करण्यात आले. लखनऊ च्या इंदिरा गांधी प्रतिष्टान येथे आयोजित ३ दिवसीय परिषदेची थीम *परवडण्यासारखे आणि राहण्यायोग्य शहरं(Accessible & Liveable Cities)* असे आहे. 

१२ व्या अर्बन मोबिलिटी इंडिया परिषदेत महा मेट्रोने आपला स्टॉल लावला असून याचे रीतसर उद्घाटन आज मा.मुख्यमंत्री,उत्तर प्रदेश आणि मा. केंद्रीय राज्यमंत्री,भारत सरकार आणि सचिव (शहरी विकास) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित महा मेट्रो तर्फे नागपूर आणि पुणे येथे राबविण्यात येणाऱ्या आधुनिक मेट्रो रेल परिवहन, मल्टी मॉडेल इंटीग्रेशन,मल्टी लेयर ट्रान्सपोर्ट,महा कार्ड आदी अश्या विविध अनोख्या बाबीं संबंधी माहिती मान्यवरांना दिली.

महा मेट्रोने लावलेल्या प्रदर्शनीचे मुख्य आकर्षण नाशिक येथे सुरु होणाऱ्या मेट्रो नियो प्रकल्प या परिषदमध्ये प्रमुख आकर्षण असून मेट्रो नियो प्रकल्प देशात पहिल्यादाच नाशिक येथे सुरु होणार असून महा मेट्रो तर्फे हा प्रकल्प राबविला जाणार आहे. हा अनोखा प्रकल्प आज पासून सुरु झालेल्या युएमआय परिषदेत सर्वांच्या आकर्षणाचा तसेच चर्चेचा विषय ठरला, मेट्रो नियो प्रकल्पाची वैशिष्ट्ये आणि याचे वेगळेपण जाणून घेण्याकरता परिषदेत मेट्रो तर्फे लावलेल्या स्टॉलवर बघ्यांनी चांगलीच गर्दी केली होती. या प्रकल्पासंबंधी स्टॉल वर उपस्थित असलेल्या मेट्रो कर्मचाऱ्याकडून माहिती जाणून घेतांना हा प्रकल्प कधी सुरु होणार या संबंधीची उत्सुकता त्यांना होती. या व्यतिरिक्त महा मेट्रोने वृक्ष पुनर्रोपण, कॉमन मोबिलीटी कार्ड,नॉन फेयर बॉक्स रेव्हेन्यू,५ डी-बीम,हरित उपक्रम,ईलेव्कट्रीक व्हेइकल चार्जिंग स्टेशन असे आहे. या उद्घाटन प्रसंगी महा मेट्रोचे वतीने संचालक (रोलिंग स्टॉक) श्री. सुनील माथुर,कार्यकारी संचालक (प्रशासन) श्री. अनिल कोकाटे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. 
यावर्षीच्या अर्बन मोबिलिटी इंडिया-२०१९ परिषदचे मुख्य विषय सार्वजनिक परिवहन आधुनिकीकरण,कार्बनचे उत्सर्जन रोकणे,शहरी परिवहनात परिवर्तन करण्या करिता नवीन तंत्रज्ञानाचा वापर,कार्डच्या माध्यमाने देयके देत डिजिटल इंटीग्रेशन करने, परिवहन आणि पर्यावरणात सुधार,गैर-मोटरचलित परिवहनाला प्रोत्साहन देणे तसेच परिवहनाचेचे भविष्य,विद्युत चलित परिवहन, मेट्रो रेल असे विषय आहेत. सदर अर्बन मोबिलिटी इंडिया परिषद दर वर्षी आयोजित केली जाते. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात ही परिषद आयोजित करण्याचा मान शहराला आणि महा मेट्रोला मिळाला होता.